तरुण भारत

मिरज रेल्वे स्थानक परिसरात पोलीस चौकी करा

मिरज / प्रतिनिधी

मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या मिरज रेल्वे स्थानक, मुख्य बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसापासून चोरीचे प्रकार वाढले आहेत. वाढत्या लुटमारीसह गुन्हेगारी रोखण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी मिरज शहर सुधार समितीने केली आहे. याबाबत पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. पोलीस उपाधीक्षक वीरकर यांनी या मागणीची दखल घेत पोलीस चौकीसाठी सुखनिवास हॉटेल समोरील महापालिकेची बंद असलेले जकात नाक्याची जागा निश्चित करून तेथे पोलीस चौकी उभारावी, आशा सूचना दिल्या आहेत.

सोमवारी मिरज शहर सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष संतोष माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलीस उपाधीक्षक वीरकर यांची भेट घेतली. महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीतील वाढत चाललेल्या गुन्हेगारी बाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. मिरज रेल्वे स्थानक, मुख्य बस स्थानक, शहरी बस स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेत प्रवाशांना तसेच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मारहाण करून लुटण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

Advertisements

या परिसरात गांजासह अंमली पदार्थांची विक्री जोमात सुरू आहे. अशी गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्याची गरज आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घ्यावी. तात्काळ पोलीस चौकी उभारून तेथे सक्षम पोलीस कर्मचारी नेमावेत, अशी मागणी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी केली.

Related Stories

दोन हजारची नोट झाली दुर्मिळ

Abhijeet Shinde

सांगली : अन्यथा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन – पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Shinde

आष्टा शहरावर आता ड्रोनची नजर, विनाकारण फिरणाऱ्यावर वाँच

Abhijeet Shinde

सांगली : वाढत्या रूग्णसंख्येला प्रशासन जबाबदार

Abhijeet Shinde

मध्य रेल्वे महाप्रबंधकांकडून रेल्वे दुहेरीकरणाची पाहणी

Abhijeet Shinde

सांगली : लॉकडाऊनच्या भीतीने मिरजेत बाजार पेठांमध्ये झुंबड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!