तरुण भारत

खडीमशीन बंद करण्यासाठी रणकुंडये ग्रामस्थांचा मोर्चा

किणये ग्रा. पं. ला दिले निवेदन

आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी

Advertisements

रणकुंडये गावाजवळ असलेल्या खडीमशीन बंद करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावाजवळ असलेल्या तीन क्वारींमुळे नागरिकांसह पशुप्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच गावाजवळून अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. क्वारींमुळे गावकऱयांचे जगणे मुश्कील झाले असल्यामुळे संतप्त झालेल्या रणकुंडये गावच्या ग्रामस्थांनी सोमवारी किणये ग्राम पंचायतीवर मोर्चा काढला.

रणकुंडये गावाजवळ तीन क्वारी आहेत. या क्वारींच्या धूळमातीमुळे शेतशिवारातील पिके धोक्मयात आली आहेत. तसेच खडीमशीनमध्ये लावण्यात येणाऱया सुरुंगामुळे गावकऱयांना धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा खडीमशीन मालकांना सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा तक्रारी नागरिकांतून होऊ लागल्या आहेत.

क्वारींमुळे गावच्या मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या वाहनांमुळे गावातील अंगणवाडीच्या बालकांना तसेच विद्यार्थीवर्गाला रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे. सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे आम्हा गावकऱयांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.

गावचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. बहुतांशी लोक शेतीवरच अवलंबून आहेत. खडीमशीनच्या आजूबाजूला अनेक शेतकऱयांच्या शेती आहेत. खडीमशीनमधील येणारी धूळमाती थेट पिकांवर येऊन पडू लागली आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत असल्याचे शेतकऱयांनी सांगितले. तसेच धूळ पडत असल्यामुळे पिकेही खराब होऊ लागली आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

धूळमातीमुळे परिसरातील वातावरण दूषित होऊ लागले आहे. यामुळे शेतकरी, पशुपक्षी या सर्वांनाच याचा सामना करावा लागतो आहे. सदर खडीमशीन्समुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या खडीमशीन्ससंदर्भात रितसर चौकशी करून सदर ठिकाणच्या खडीमशीन्स बंद करून त्या अन्य ठिकाणी हलविण्यात याव्यात, अशी मागणी रणकुंडये ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

ग्राम पंचायत सेपेटरी निंगाप्पा अस्ती व तलाठी भारती यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाबाबत आपण प्रशासनाच्या वरि÷ अधिकाऱयांशी चौकशी करून येत्या आठ दिवसांत यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन ग्राम पंचायत सेपेटरी यांनी दिले.

निवेदन देताना मुरारी पाटील, नूरसाब ताशिलदार, निंगाप्पा पाटील, यल्लाप्पा पाटील, हणमंत पाटील, परशराम कोलकार, गंगाराम पाटील, फारुकबेग जमादार, राणू पाटील, शिवाजी हाजगोळकर, राजू पाटील, गौस पठाण, इम्रान जमादार, नियाज बुकारी, कल्लाप्पा पाटील, प्रभाकर पाटील, आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ग्राम पंचायतीला देण्यात आलेल्या निवेदनावर सुमारे 125 हून अधिक शेतकऱयांच्या सहय़ा आहेत.

Related Stories

पुन्हा एकदा सेवा देण्यास अंजुमन सज्ज

Amit Kulkarni

सोनोली – बिजगर्णी रस्त्यावर दलदल, खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

अपघातात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 20 लाख देण्याचे आदेश

Patil_p

रेबीज लसच उपलब्ध नसल्याने संताप

Patil_p

त्या’ नराधमांना फाशी द्या, सरकारने राजीनामा द्यावा

Patil_p

बेंगळूर पोलीस दलातील २१ पोलिसांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!