तरुण भारत

पिछाडीवरून एफसी गोवाची नॉर्थईस्ट युनायटेडशी बरोबरी

क्रीडा प्रतिनिधी/मडगाव

सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत काल फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेला एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत संपला. नॉर्थईस्टसाठी इद्रिसा सिलाने तर एफसी गोवासाठी इगोर अँगुलोने गोल केले. या निकालाने उभय संघाना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. नॉर्थईस्टचे आता 3 सामन्यांतून 5 तर एफसी गोवाचे 3 सामन्यांतून 2 गुण झाले आहेत.

पहिल्या सत्रात इद्रिसा सायलाच्या दोन चाली वगळता खेळावर एफसी गोवाचे वर्चस्व आढळुन आले. सामन्याच्या दुसऱयाच मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडच्या लुईस मिंगेल माशादोचा बचाव भेदणारा कॉर्नर एफसी गोवाच्या बचावळीतील खेळाडूने क्लियर केला. त्यानंतर आल्बर्ट नोगुएराच्या पासवर एफसी गोवाच्या जॉर्ज ऑर्तिजने हाणलेला शक्तिशाली फटका नॉर्थईस्टचा बचावपटू डायलन फॉक्सने ब्लॉक केला.

9व्या मिनिटाला सावियर गामाच्या पासवर इगोर अँगुलोने हाणलेला फटका परत एकदा डायलन फॉक्सने केलेल्या उत्कृष्ट बचावामुळे एफसी गोवाचा गोल होऊ शकला नाही. एफसी गोवाची आक्रमणांची मालिका पुढेही चालू राहिली. यावेळी 24व्या मिनिटाला जॉर्ज ऑर्तिज आणि एदू बेडियाच्या चालीवर सावियर गोमाने गोल करण्याची संधी दिशाहिन फटका हाणून वाया घालविली.

सामन्यातील पहिली धोकादायक चाल नॉर्थईस्टने 33व्या मिनिटाला रचली. यावेळी लुईस माशादोच्या फ्रिकीकवर इद्रिसा सायलाचा हेडर एफसी गोवा गोलच्या आडव्या पट्टीवरून गेला. 38व्या मिनिटाला इद्रिसाला डी कक्षेत पाडल्याबद्दल दिलेल्या पेनल्टीवर त्यानेच गोलरक्षक मोहम्मद नवाजला चकविले आणि नॉर्थईस्टला आघाडीवर नेले. मात्र त्यांची ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. मध्यंतराला तीन मिनिटे शिल्लक असताना ब्रेंडन फर्नांडिसने डाव्या बगलेतून दिलेल्या पासवर इगोरने चेंडूला सहज टॅप केले एफसी गोवाला बरोबरीत आणले.

दुसऱया सत्रातील लढतीवरीही एफसी गोवाने आपली छाप पाडली. प्रथम 48व्या मिनिटाला एwबानभा डोहलिंगने डाव्या बगलेतून दिलेल्या क्रॉसवर इगोर अँगुलोने टोलविलेला हेडर गोलमध्ये जाताना किंचित हुकला. 84व्या मिनिटाला एफसी गोवाला मिळालेली संधी गोलच्या उजव्या पोस्टला आदळून बाहेर गेली.

 आल्बेर्तो नोगुएराने लांब पल्ल्यावरून मारलेला फटक्याने गोलरक्षक सुभाषिश रॉय चौधरीला यावेळी चकविले होते. शेवटच्या मिनिटाला एदू बेडिया आणि जॉर्ज ऑर्तिगाने संयुक्तपणे रचलेली चालही यशस्वी होऊ शकली नाही.

Related Stories

इंग्लंडचा 7 गडय़ांनी विजय

Patil_p

पांघल, बिस्त, संजीत अंतिम फेरीत

Patil_p

राफाएल बर्गामास्को भारतात येण्यास सज्ज

Patil_p

स्पेनचा नदाल उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

आयपीएलमधील युवा यष्टीरक्षकांसाठी धोनी प्रेरणास्थान

Patil_p

वीज कोसळून बांगलादेशचे दोन युवा क्रिकेटपटू ठार

Patil_p
error: Content is protected !!