तरुण भारत

म्युचुअल फंडस्ना छोटय़ा शहरांची पसंती

उद्योगाचे वित्तीय मूल्य 28 लाख कोटींवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत म्युचुअल फंडस् उद्योगाचे वित्तीय मूल्य 28 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फंडस्मध्ये छोटय़ा शहरातील लोकांचा गुंतवणूकीकडे कल वाढला असल्याचे दिसून आले आहे. गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून म्युचुअल फंडचा विचार केला जात आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा ओढा या फंडांकडे वळला असल्याचेही दिसून आले आहे.

एएमएफआय या म्युचुअल फंड उद्योगाशी संबंधीत संघटनेकडून सदरची माहिती देण्यात आली आहे. मागच्या वर्षी सेबीने म्युचुअल फंड कंपन्यांवर दबाव टाकला होता. आपल्या गुंतवणूकीत वाढीसाठी कंपन्यांनी छोटय़ा शहरांकडे वळावे असे सेबीने सुचवले होते.

कोरोनाकाळात 50 लाख डिमॅट खाती

शेअर्ससोबत इक्वीटी फंडांमध्ये आणि इतर   फंडात गुंतवणुकीसाठी डिमॅट खाते उघडणे गरजेचे असते. एप्रिलनंतर केवळ 6 महिन्यात 50 लाखहून अधिक डिमॅट खाती उघडण्यात आल्याचे सांगण्यात येते. अनेकांनी वेतन कपात व नोकरीवरून कमी केल्यानंतर गुंतवणूकीकडे जास्त करून लक्ष दिल्याचे दिसले. त्यातही गुंतवणूकीचा क्रम ठरवताना म्युचुअल फंडांचा विचार आवर्जून केल्याचे पाहायला मिळाले.

Related Stories

अदानींची 29 हजार कोटींच्या आयपीओसाठी मोठी योजना

Amit Kulkarni

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 280 अंकांनी वधारला

Patil_p

लॉकडाऊनमुळे ईपीएफमधून 75 टक्के रक्कम काढता येणार

tarunbharat

विमा कंपन्यांकडून मिळणार कॅशलेस उपचार सुविधा

Patil_p

सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक उच्चांकावर

Patil_p

अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चा भारतात प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!