तरुण भारत

कोरोना बळींचे सत्र सुरुच

प्रतिनिधी/ पणजी

सोमवारी कोरोनामुळे गोमेकॉत एकाचा मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 688 झाली आहे. काल नव्याने 159 कोरोनाबाधित सापडले तर 150 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या 1335 सक्रिय रूग्ण आहेत. संशयित रूग्ण म्हणून 51 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 149 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.

Advertisements

आतापर्यंत एकूण 47963 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 45940 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गोव्याबाहेरून आलेले कोरोनाबाधित सापडत असून काल आणखी एक जण बाधित मिळाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.

विविध आरोग्य खात्यातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पुढिलप्रमाणे : डिचोली 32, सांखळी 26, पेडणे 28, वाळपई 18, म्हापसा 49, पणजी 81, हळदोणा 20, बेतकी 32, कांदोळी 65, कासारवर्णे 5, कोलवाळ 14, खोर्ली 33, चिंबल 66, शिवोली 52, पर्वरी 105, मये 17, कुडचडे 16, काणकोण 37, मडगाव 113, वास्को 71, बाळ्ळी 15, कासावली 59, चिंचिणी 32, कुठ्ठाळी 56, कुडतरी 37, लोटली 39, मडकई 26, केपे 23, सांगे 7, शिरोडा 14, धारबांदोडा 10, फोंडा 94, नावेली 35. कोरोनाबाधित वाढत असून बरे होण्याऱयांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.

30 नोव्हेंबरपर्यंतचे एकूण रूग्ण                47963

30 नोव्हेंबरपर्यंतचे बरे झालेले रूग्ण          45940

30 नोव्हेंबरपर्यंतचे सक्रिय रूग्ण               1335

30 नोव्हेंबरचे नवे रूग्ण              159

30 नोव्हेंबर रोजी बरे झालेले रूग्ण           150

30 नोव्हेंबर रोजीचे कोरोना बळी 1

30 नोव्हेंबरपर्यंतचे एकूण बळी                 688

Related Stories

बेपत्ता सिद्धी नाईकचा बागा येथे बुडून मृत्यू

Omkar B

केरोना : बाधित व बळींची संख्या नियंत्रणात

Omkar B

आपच्या रोजगार यात्रेचा समारोप

Amit Kulkarni

विजयश्री’ पुस्तकाचे प्रकाशन

Amit Kulkarni

शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानचा वार्षिक कालोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

साळगावात कोरोना टीका उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!