तरुण भारत

दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा आज लिलाव

प्रतिनिधी/ खेड

कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने लोटे येथे पेट्रोलपंपासाठी खरेदी केलेल्या 30 गुंठे क्षेत्रातील भूखंडाचा 1 डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लिलाव होणार आहे. मुंबकेतील दाऊदच्या 4 मालमत्ता खरेदी करणारे सर्वोच्च न्यायालयातील वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी साडे सत्तावीस लाखाची अनामत रक्कम भरून लिलावातील सहभाग निश्चित केला आहे.

Advertisements

 दाऊदचे मूळगाव असलेल्या मुंबकेतील 6 मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेनंतर लोटेतील भूखंडाची लिलाव प्रक्रिया मंगळवारी पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेकडेच साऱयांच्या नजरा रोखल्या आहेत. सकाळी 10 ते 11 यावेळेत ही प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक बोलीसाठी 3 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम व कागदपत्रे सेफिमामध्ये जमा करण्याची मुदत 27 नोव्हेंबरपर्यंत होती. या मुदतीत ऍड. भूपेंद्र भारद्वाज यांनी अनामत रक्कम व आवश्यक कागदपत्रे जमा केली आहेत. हा भूखंड ऍड. भारद्वाज विकत घेण्याची दाट शक्यता आहे.

Related Stories

रत्नागिरी : खेडच्या पाणीटंचाईप्रश्नी आमदार योगेश कदम आक्रमक

triratna

6,820 जणांनी घेतली कोरोना लस

NIKHIL_N

सरपंचांचे भवितव्य ग्रामस्थांच्या हाती

NIKHIL_N

रत्नागिरी : उधळेतील चोरीप्रकरणी चोरटा 5 तासातच जेरबंद

triratna

चिरेखाणीत बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

Patil_p

शिवसेनेने एकसंघ होऊन काम करण्याची गरज- केसरकर

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!