तरुण भारत

कोल्हापूर : वारणेची एफआरपी २९५१ रुपये जाहिर : आ. विनय कोरे

तोडणी वहातूकदार यांचीही रक्कम जमा

प्रतिनिधी / वारणानगर

Advertisements
आ. विनय कोरे

येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने २०२०-२०२१ या चालू गळीत हंगामाची किफायतशीर किंमत (एफ.आर.पी.) प्र. मे. टनास रुपये २९५१ याप्रमाणे संबंधित ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर जमा केली आसून तोडणी व वाहतूक कंत्राटदारांचे तसेच वहानमालकांचे नविन वाढलेल्या दराप्रमाणे होणारी रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा केली आहे अशी माहिती वारणा उद्योग समुहाचे अध्यक्ष व कारखाना संचालक आ. विनय कोरे यांनी दिली.

वारणा कारखान्याने गेल्या ऑफ सिझनमध्ये मशिनरीमध्ये काही तांत्रिक बदल केल्यामुळे कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने गळीत करत असून कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता अतिशय चांगली मिळत आहे. सरासरी साखर उतारा ११.१० टक्के इतका आला आहे. त्याप्रमाणे वाया जाणाऱ्या साखरेचे प्रमाण अतिशय नियंत्रणात आले आहे व साखरेची प्रतही उत्तमप्रकारे निघत आहे. कारखान्याचा वीज निर्मिती प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालू असून त्याचे व्यवस्थापनही वारणा कारखान्याकडे हस्तांतरित होत आहे. असे आ. विनय कोरे यानी सांगून डिस्टीलरी प्रकल्पही प्रतिदिनी ७५००० लिटर ने चालू असून सिरपपासून इथेनॉल पुरवठ्याचे ९२ लाख लिटरचे टेंडर मंजूर झाले असून गेल्या २० दिवसात ११ लाख लिटर इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवठा पूर्ण केला असून सध्या प्रतिदिनी ७५००० लिटर तयार होणारे इथेनॉल ऑनलाईन पुरवठा होत आहे असे सांगितले.

कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखाना मशिनरीची वाढविलेली तांत्रिक कार्यक्षमता, वाढलेली रिकव्हरी, साखरेच्या प्रतीमध्ये झालेली सुधारणा त्याचबरोबर व्यवस्थापन खर्च, व्याज खर्च, कामगार पगार खर्च, मटेरियल खरेदी या सर्वांमध्ये केलेली काटकसर याचा परिणाम कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारणेत झाला असून अतिशय अडचणीच्या काळात कारखाना कामकाजात झालेल्या सुधारणेमुळे आता कारखान्याचा वाईट काळ संपलेला आहे असे आ. विनय कोरे यानी सांगून येथुन पुढे सर्व ऊस उत्पादकांची ऊस बिले व तोडणी कंत्राटदार व वाहन मालकांची बिले वेळेवर दिली जातील असे सांगितले.

सर्व ऊस उत्पादक सभासद, वाहतूकदार मालक व कारखान्याचे कामगार यांनी सहकार्य करुन सर्व ऊस आपल्या वारणा कारखान्याला द्यावा व कारखान्याचे १२.५० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेस सहकार्य करावे असे आवाहन वारणा उद्योग समुहाचे अध्यक्ष तसेच मार्गदर्शक आम. विनय कोरे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रतापराव पाटील व कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी केले आहे.

Related Stories

मराठा समाज महाविकास आघाडीला माफ करणार नाही : चंद्रकांत पाटील

Shankar_P

कोल्हापुरात मंगळवारच्या 39 पॉझिटिव्हने रुग्णसंख्या 83 वरून 122 वर

Shankar_P

कोल्हापूर जिह्यात आणखी १७ रुग्णांची भर

triratna

अब्दुल लाटच्या कन्येची पॅरिस मधील भारतीय दूतावासमध्ये द्वितीय सचिवपदी नियुक्ती

triratna

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी संजयसिंह चव्हाण; मित्तल यांची बदली

Shankar_P

अंध 15 विद्यार्थ्यांना दीड लाखांची शिष्यवृत्ती प्रदान

triratna
error: Content is protected !!