तरुण भारत

अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / शिमला :


बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशीराने याबाबत माहिती दिली. 

Advertisements


अधिक माहिती देताना आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी सांगितले की, जिल्हा मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार सनी देओल आणि त्यांचे मित्र 3 डिसेंबर रोजी मनालीवरुन मुंबईला परत जाणार होते. मुंबई जाण्याआधी त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


दरम्यान, सनी देओल यांची नुकतीच मुंबईमध्ये खांद्याची सर्जरी झाली आहे. त्यानंतर काही दिवस आराम करण्यासाठी ते मनालीमधील आपल्या फार्म हाऊसवर गेले होते. मागील काही दिवसांपासून ते तिथेच थांबलेले होते.

Related Stories

कोरोना : महाराष्ट्रात 3,579 नवे बाधित; 70 मृत्यू

Rohan_P

सुप्रिया सुळेंचं महाविकास आघाडी सरकारसंदर्भात भाकीत; म्हणाल्या…

Abhijeet Shinde

पाकचा नवीन नकाशा; काश्मीर, जुनागढवर ठोकला दावा

datta jadhav

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक

datta jadhav

लोक मदत मागत असताना, तुम्ही हसू कसं शकता ; प्रियांका गांधींचा पीएम मोदींना सवाल

Abhijeet Shinde

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार पार

Rohan_P
error: Content is protected !!