तरुण भारत

सलमान खानला पुन्हा दिलासा

काळवीट शिकार प्रकरण : सुनावणीला अनुपस्थित राहता येणार

वृत्तसंस्था / जोधपूर

Advertisements

काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान मंगळवारी पुन्हा एकदा न्यायालयात अनुपस्थित राहिले आहेत. महामारीचा दाखला देत सुनावणीस गैरहजर राहण्याची सूट द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज जिल्हा न्यायालयात सलमानच्या वतीने करण्यात आला होता. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. कोरोनाच्या काळात सलमानला 8 महिन्यांमध्ये सहाव्यांदा ही सूट देण्यात आली आहे. सलमानने याप्रकरणी आतापर्यंत 15 वेळा अनुपस्थित राहण्याची अनुमती मिळविली आहे.

काळवीट शिकारीशी संबंधित शस्त्रास्त्र कायद्याच्या एका प्रकरणी सलमानला मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचा निर्देश देण्यात आला होता. काळवीट शिकार प्रकरणी 5 एप्रिल 2018 रोजी सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सलमानने या शिक्षेला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे.

सैफ, नीलम, तब्बू, सोनाली आरोपमुक्त अन्य आरोपी अभिनेता सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तर सलमानची जोधपूर तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. तीन दिवसांनी सलमानची जामिनावर सुटका झाली होती.

Related Stories

स्थापनादिनी खाली पडला काँग्रेसचा झेंडा

Patil_p

‘प्राणवायू’अभावी 25 रुग्णांचा गेला प्राण

Patil_p

जवानांना आता वज्र अन् त्रिशूळाचाही आधार

datta jadhav

दिल्लीत कोरोनासंबंधी महासर्वेक्षण

Patil_p

मणिपूर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथऊजम यांचा भाजपमध्ये प्रवेश

Abhijeet Shinde

राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!