तरुण भारत

ब्रिटन देणार ‘हुवाई’ला टक्कर

चीनची होणार आणखी कोंडी, नवी ‘जनरेशन’ योजना आणणार  

वृत्तसंस्था / लंडन

Advertisements

जगात आता 4-जी नेटवर्कचा वापर सर्वत्र होत आहे. परंतु सध्याच्या वेगवान तंत्रज्ञानाची मदत घेत 5-जी नेटवर्क स्विकारण्याकडे वाटचाल सुरु आहे. याचाच भाग म्हणून ब्रिटीश सरकारने नवीन जनरेशन योजना आखण्यावर भर दिला आहे. 

यामध्ये 5-जी तंत्रज्ञान व संबंधीत उपकरणांसाठी नवीन योजना आखण्याच्या तयारीत हा देश आहे. यासाठी सप्टेंबर 2021 पासून ब्रिटनच्या 5 जी नेटकवर्कमधील दूरसंचार कंपन्यांना हुआई या चीनी कंपनीची उपकरणे वापरण्यावर बंदी घालण्याची तयारी करण्यात आहे. या बदलासाठी आणि 5-जी विस्तारासाठी 25 कोटी पौंडांची तरतूद केली जाणार आहे. 2027 पर्यंत हुआई कंपनीच्या उपकरणांचा वापर शुन्यावर आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.  

चालू आठवडय़ात ब्रिटनच्या संसदेत नवीन दूरसंचार कायदा सहमत करण्यावर विचारविनिमय होण्याचे संपेत आहेत. याअगोदर ब्रिटन सरकारने चीनची कंपनी हुआईची नवी उपकरणे आणि दूरसंचार सेवांवर अमेरिकेप्रमाणे निर्बंध लागू करुन खरेदी थांबविण्याची घोषणा या अगोदरच केली आहे.

नव्या मार्गाचा शोध

आज आम्ही आमच्या 5 जी नेटवर्कमधून सेवा देत आहोत. विदेशी वस्तूंच्या उपयोगातून निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. यासाठी वेगळा मार्ग चोखाळण्याच्या तयारीत आम्ही असल्याचे ब्रिटनचे डिजिटल विभागाचे मंत्री ओलिवर डाउडेन यांनी म्हटले आहे.

Related Stories

अलिबाबा मेगा सेलमध्ये 56 अब्ज डॉलर्सची ऑर्डर प्राप्त

Omkar B

सोने आयात 99 टक्क्यांनी घटली

Patil_p

होंडाने विदेशातील उत्पादन थांबवले

Patil_p

खेळणी विक्रीत अधिक वाटा मिळवणार

Patil_p

केकेआरकडून रिलायन्स रिटेलला मिळाला धनादेश

Patil_p

‘आयआरसीटीसी’ची लक्झरी क्रूझ लायनर सर्व्हिस लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!