तरुण भारत

धावत्या बसमध्ये 80 फुटांची गॅस पाईप घुसली आरपार; 2 ठार, 12 जखमी

ऑनलाईन टीम / जयपूर : 

धावत्या बसमध्ये 80 फुटांची गॅस पाईप आरपार घुसल्याने एका प्रवाशाचे धड शीरावेगळे झाले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी झाले आहेत. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सांडेराव पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. 

Advertisements

सांडेराव पोलीस स्थानकाजवळच्या चार पदरी रस्त्याच्या बाजूने गॅसची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु होते. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मारवाड जंक्शनवरुन खासगी बस पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी 80 फुटांचा लांब पाईप दुसऱ्या ठिकाणी हलविताना हायड्रॉलिक मशीन ऑप्रेटरकडून झालेल्या चुकीमुळे  पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला. 

या अपघातात धड शीरावेगळे झाल्याने एकाचा मृत्यू झाला. तर डोक्याला गंभीर जखम झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.12 जण जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Stories

लॉक डाऊन हा कोरोनाचा फैलाव रोखण्यावर उपाय नाही : राहुल गांधी

prashant_c

दोन महिन्यांमध्ये प्रथमच रुग्णसंख्येत घट

Patil_p

देशात 24 तासात कोरोनाचे 4187 बळी

datta jadhav

बिहारमध्ये पुन्हा रालोआचेच सरकार

Patil_p

SBI चा पुढाकार; 30 कोटी खर्च करुन उभारणार कोविड रुग्णालये

datta jadhav

मेहनत अन् घामाने कमाविला जनतेचा विश्वास

Patil_p
error: Content is protected !!