तरुण भारत

सातारा जिल्ह्यात पदवीधरसाठी 58.27 तर शिक्षकसाठी 81.96 टक्के मतदान

प्रतिनिधी / सातारा

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी काल जिल्ह्यात 58.27 टक्के मतदान झाले तर शिक्षक मतदारसंघासाठी 81.96 टक्के मदान झाले आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी 132 मतदान केंद्रे व शिक्षक मतदारसंघासाठी 44 मतदान केंद्रे होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे मतदान केंद्र मतदानाच्या आदल्या दिवशी सॅनिटायझर करण्यात आली होती. मतदानासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते. कुठल्याही मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन मतदान करणाऱ्या नागरिकांमध्ये सुरक्षीत अंतर ठेवण्यासाठी खास नियोजन करण्यात आले होते. या मतदान प्रकियेत 1 हजार 276 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्तीबरोबरचर 201 आरोग्य कर्मचाऱ्यांचीही मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आलेली होती. काल 1 डिसेंबर रोजी झालेले मतदान जिल्ह्यात शांततेत व सुरळीतपणे पार पडले
पदवीधर मतदारसंघासाठी 39 हजार 397 पुरुष व 19 हजार 673 स्त्री. इतर 1 मतदार होते. त्यापैकी 24 हजार 966 पुरुष तर 9 हजार 455 स्त्री मतदारांसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे.

त्याची टक्केवारी 58.27 इतकी आहे. यामध्ये जावली तालुक्यात 834 पुरुष व 378 स्त्री मतदार असून त्यापैकी 521 पुरुष तर 168 स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला याची टक्केवारी 56.85 इतकी आहे. कराड तालुक्यात 10 हजार 968 पुरुष तर 4 हजार 613 स्त्री मतदार आहेत. यापैकी 6 हजार 698 पुरुष तर 2 हजार 60 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 56.21 इतकी आहे. खंडाळा तालुक्यात 1 हजार 458 पुरुष तर 808 स्त्री मतदार असून 1 हजार 41 पुरुष तर 511 स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 68.49 इतकी आहे.

Advertisements

खटाव तालुक्यात 2 हजार 491 पुरुष तर 1 हजार 87 स्त्री मतदार असून 1 हजार 652 पुरुष तर 614 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 63.33 इतकी आहे. कोरेगाव तालुक्यात 2 हजार 619 पुरुष तर 1 हजार 507 स्त्री मतदार असून 1 हजार 656 पुरुष तर 746 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 58.22 इतकी आहे. महाबळेश्वर तालुक्यात 367 पुरुष तर 181 स्त्री मतदार असून 265 पुरुष तर 119 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 70.07 इतकी आहे. माण तालुक्यात 2 हजार 606 पुरुष तर 874 स्त्री मतदार असून 1 हजार 649 पुरुष तर 412 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 59.22 इतकी आहे. पाटण तालुक्यात 2 हजार 772 पुरुष तर 1 हजार 573 स्त्री मतदार असून 1 हजार 765 पुरुष तर 759 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 58.09 इतकी आहे.

फलटण तालुक्यात 6 हजार 357 पुरुष तर 2 हजार 865 स्त्री मतदार असून 4 हजार 194 पुरुष तर 1 हजार 522 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 61.98 इतकी आहे. सातारा तालुक्यात 7 हजार 149 पुरुष तर 4 हजार 771 स्त्री व इतर 1 मतदार असून 4 हजार 171 पुरुष तर 1 हजार 857 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 50.57 इतकी आहे. वाई तालुक्यात 1 हजार 776 पुरुष तर 1 हजार 16 स्त्री मतदार असून 1 हजार 354 पुरुष तर 687 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 73.10 इतकी आहे. असे मिळून जिल्ह्यात पदवीधरसाठी 58.27 टक्के इतके मतदान केले आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी 5 हजार 121 पुरुष व 2 हजार 589 स्त्री, इतर 1 मतदार आहेत. त्यापैकी 4 हजार 386 पुरुष तर 1 हजार 934 स्त्री मतदारांसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 81.96 इतकी आहे. यामध्ये जावली तालुक्यात 107 पुरुष तर 33 स्त्री मतदार असून 93 पुरुष तर 31 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 88.57 इतकी आहे. कराड तालुक्यात 1 हजार 115 पुरुष तर 767 स्त्री मतदार असून 912 पुरुष तर 573 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 78.91 इतकी आहे. खंडाळा तालुक्यात 270 पुरुष तर 134 स्त्री मतदार असून 236 पुरुष तर 101 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 83.42 इतकी आहे. खटाव तालुक्यात 474 पुरुष तर 128 स्त्री मतदार असून 420 पुरुष तर 106 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 87.38 इतकी आहे. कोरेगाव तालुक्यात 435 पुरुष तर 209 स्त्री मतदार असून 390 पुरुष तर 169 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 86.80 इतकी आहे. महाबळेश्वर तालुक्यात 80 पुरुष तर 25 स्त्री मतदार असून 60 पुरुष तर 17 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 73.33 इतकी आहे. माण तालुक्यात 398 पुरुष तर 108 स्त्री मतदार असून 349 पुरुष तर 80 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

त्याची टक्केवारी 84.78 इतकी आहे. पाटण तालुक्यात 424 पुरुष तर 161 स्त्री मतदार असून 368 पुरुष तर 129 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 84.96 इतकी आहे. फलटण तालुक्यात 571 पुरुष तर 200 स्त्री मतदार असून 518 पुरुष तर 175 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 89.88 इतकी आहे. सातारा तालुक्यात 995 पुरुष तर 693 स्त्री, इतर 1 मतदार असून 829 पुरुष तर 453 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 75.90 इतकी आहे. वाई तालुक्यात 252 पुरुष तर 131 स्त्री मतदार असून 211 पुरुष तर 100 स्त्री मतदारांनी आपला हक्क बजावला आहे त्याची टक्केवारी 81.20 इतकी आहे. असे मिळून जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात 81.96 टक्के इतके मतदान झाले आहे.

Related Stories

कास रोडवर धनदांडग्यांची अनधिकृत बांधकामे जोमात प्रशासन मात्र कोमात

triratna

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणाऱ्या युवकास कर्नाटकातून अटक

triratna

वादग्रस्त अभिताभ गुप्तांवर ठाकरे सरकार मेहरबान

Patil_p

सातारा : गेल्या 24 तासात एकूण सरासरी 5.61 मि.मी. पाऊस

triratna

रणजितभैय्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

Patil_p

पालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करावी

Patil_p
error: Content is protected !!