तरुण भारत

तिसंगीत दारू धंद्यावर धाड, ३ लाख ३० हजाराचा ऐवज जप्त

खेड पोलिसांची धडक कारवाई, तिघांवर गुन्हा

प्रतिनिधी / खेड

Advertisements

तालुक्यातील तिसंगी – खोपकरवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून रसायनासह हातभट्टीचे साहित्य असा ३ लाख ३० हजार ३५० रूपयांचा ऐवज हस्तगत केला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजित भोसले, रोशन भोसले, स्वप्निल भोसले ( सर्व रा. तिसंगी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

तिसंगी – खोपकरवाडी नजीकच्या जंगलमय भागात हे तिघेजण संगमताने गावठी दारूची हातभट्टी चालवत असल्याची कुणकुण येथील पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, सहाय्यक पोलीस फौजदार बुरटे, पोलीस शिपाई अजय कडू, राहुल कोरे, प्रकाश पवार, रोहित मांगले, अरविंद जमदाडे, राम नागुलवर, संभाजी मोरपडवार, किरण चव्हाण, सचिन जाधव, रूपेश पेंढामकर आदींचे पथक जंगलमय भागात पोहचले.

याठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत बेकायदेशीर गावठी दारू बनवण्याची हातभट्टी उद्धवस्त करत गावठी दारू निर्मितीचे १० हजार ५०० लिटर रसायन जप्त केले. हे रसायन नाशवंत असल्याने व जंगलातून बाहेर काढून वाहतूक करणे शक्य नसल्याने रसायनाची तेथेच विल्हेवाट लावण्यात आली. पोलिसांकडून ३ लाख ३० हजार ३५० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी संशयितावर महाराष्ट्र Page 1/1 दारूबंदी अधिनियम ६५ ( ब ) ( क ) ( फ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत. कोरोनाच्या संकटापूर्वी पोलिसांनी कुळवंडी व तिसंगी येथे गावठी हातभट्टीच्या दाख धंद्यावर धाड टाकून लाखो रूपयांचा ऐवज जप्त केला होता. पोलिसांचे धाडसत्र सुरूच राहिल्याने बेकायदेशीररित्या दारूधंदा करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. कोरोना हळूहळू नियंत्रणात येवू लागल्याने जंगलमय भागात पुन्हा धगधगणारी गावठी दारूची हातभट्टी उद्धवस्त करत पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Related Stories

फसवणाऱया कंपन्या बदलताहेत, एजंट तेच!

Patil_p

उद्योजक पुष्कराज कोले यांना मातृशोक

NIKHIL_N

बोलक्या बाहुल्यातून शिक्षण आनंददायी करणारे ‘कलाशिक्षक’

Patil_p

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कामासाठी २१८ कोटी निधी मंजूर

Ganeshprasad Gogate

जिल्हा रूग्णालयात मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी

Patil_p

तेंडोली येथील डंपर व्यावसायिकाची आत्महत्या

NIKHIL_N
error: Content is protected !!