तरुण भारत

सलग तिसऱया विजयासाठी एटीके सज्ज; आज ओडिशाशी सामना

 मडगाव : सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज एटीके मोहन बागान आणि ओडिशा एफसी यांच्यात लढत होणार आहे. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येईल. दमदार फॉर्म कायम राखत धडाकेबाज विजय मिळविण्याचा एटीके मोहन बागानचा निर्धार असेल.

सध्या सलग दोन विजयाने एटीकेचे 6 गुण झाले असून ते दुसऱया स्थानावर तर दोन सामन्यांतील केवळ एका गुणाने ओडिशाचा फक्त एक गुण झाला असून ते दहाव्या स्थानावर आहेत.

Advertisements

दोन्ही संघाची मोसमातील आतापर्यंतची स्थिती परस्परविरोधी राहिली आहे. ओडिशा एफसीला एकही विजय मिळविता आलेला नाही आणि त्यांचे स्थान खालच्या गटात आहे. दोन सामन्यांतून त्यांना केवळ एकच गुण मिळाला आहे. दुसरीकडे सलग तिसरा विजय मिळवून एटीकेएमबी गुणतक्त्यात आघाडी घेऊ शकतो.

जमशेदपूरविरूद्ध पिछाडीवरून बरोबरी साधत एक गुण मिळवून ओडिशाने खाते उघडले. त्यांच्या बचावफळीची कामगिरी मात्र ढिसाळ झाली असल्यामुळे त्याबाबत चिंता असेल. स्टुअर्ट बॅक्सटर यांच्या संघावर आतापर्यंत 29 धोकादायक आक्रमणे प्रतिस्पर्धी संघाकडून झाली आहे.

एटीके मोहन बागानचा स्ट्रायकर रॉय कृष्णा याने दोन सामन्यांत दोन गोल केले आहेत. चमकदार फॉर्म कायम राखण्याचा त्याचा निर्धार असेल. यामुळे पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याला प्रतिआक्रमणावर गारद करण्याचा त्यांचा निर्धार असेल. बॅक्सटर यांना याची चांगली कल्पना असून आपल्या संघाने बचाव भक्कम ठेवावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

बॅक्सटर यांच्या ओडिशाला आघाडीफळीत परिणामकारक खेळ करावा लागेल. याचे कारण अजुनही एकही गोल न पत्करलेला दुसरा संघ हैदराबाद एफसी आहे. त्यामुळे हबास यांना आपल्या संघाकडून मैदानाच्या दोन्ही बाजूना परिणामकारक खेळाची अपेक्षा असेल.

आक्रमण आणि बचावात संतुलन साधण्याची कल्पना आहे. हा फुटबॉलचा खेळ आहे. केवळ आक्रमण किंवा केवळ बचाव असा फुटबॉल मला समजत नाही, असे यावेळी एटीकेचे प्रशिक्षक हबास म्हणाले. महत्वाचा मुद्दा म्हणजे सामन्याच्या दिवशी खेळाडूंवर कामगिरी अवलंबवून असेल असे हबास म्हणाले.

जमशेदपूर एफसीविरुद्ध बदली खेळाडू म्हणून दोन गोलांचा धडाका लावलेला स्ट्रायकर डायगो मॉरिसियो याला आजच्या सामन्यात स्टार्ट मिळू शकते. बॅक्सटर यांना आघाडीफळीतील ब्राझिलच्या मार्सेलिनोला फॉर्म गवसण्याची अपेक्षा असेल.

Related Stories

व्हेरेव्हचे माद्रीद स्पर्धेतील दुसरे जेतेपद

Patil_p

शेली प्रेजरची जलद वेळ

Patil_p

स्वायटेक-बेन्सिक अंतिम लढत

Patil_p

प्रेंच टेनिस स्पर्धेतून रेऑनिक, बेन्सिकची माघार

Patil_p

शकीब अल हसनचे संघात पुनरागमन

Patil_p

साईराज चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Omkar B
error: Content is protected !!