तरुण भारत

टी-20 क्रमवारीत मलानचा विक्रम

दुबई : टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या मानांकनात इंग्लंडच्या डेव्हिड मलानने सर्वोच्च रेटिंग गुण मिळविले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा जमविल्या, त्याचा त्याला लाभ झाला असल्याचे आयसीसीने सांगितले. 33 वर्षीय मलानने 915 मानांकन गुण मिळविले असून 900 चा टप्पा पार करणारा या प्रकारातील तो पहिला फलंदाज आहे. जुलै 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचने बरोबर 900 गुण मिळविले होते. द.आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत मलानने शानदार फलंदाजी करीत सर्वाधिक 173 धावा फटकावल्या. इंग्लंडने ही मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. शेवटच्या सामन्यात त्याने नाबाद 99 धावांची खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला आणि सांघिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत इंग्लंडला अग्रस्थानही मिळवून दिले. माजी कर्णधार नासिर हुसेननेही त्याच्या वैविध्यपूर्ण स्टाईलची आणि त्याच्या सातत्याची प्रशंसा केली आहे. मलानने फलंदाजांच्या क्रमवारीत पाकच्या बाबर आझमवर 44 गुणांची आघाडी घेतली आहे. सप्टेंबरपासून मलानने आझमला मागे टाकले आहे.

Related Stories

न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ

Patil_p

ओमानविरूद्ध लढतीत स्कॉटलंडचे पारडे जड

Patil_p

टोकियोत भारतीय नेमबाजांची मोहीम आजपासून

Amit Kulkarni

धोनीच्या टीम इंडियातील कमबॅकबाबत गांगुली म्हणतो..

Abhijeet Shinde

कर्करोग झालेल्या बालिकेच्या मदतीसाठी साऊदीच्या जर्सीचा लिलाव

Patil_p

टी-20 विश्वचषकाचा निर्णय ऑगस्टअखेर

Omkar B
error: Content is protected !!