तरुण भारत

10 हजार कोटींच्या व्यवहारावर टाटा-बिगबास्केटची सहमती

टाटा घेणार 80 टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी : ग्रॉसरी मार्केटमध्ये आपले स्थान मजबूत करणार

मुंबई  : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या टाटा आणि बिगबास्केट यांच्यातील व्यवहारासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात येत असल्याचे संकेत आहेत. यामध्ये ऑनलाईन ग्रॉसरी कंपनी बिगबास्केटमधील जवळपास 80 टक्के हिस्सेदारी टाटा समूह घेणार आहे. सदरची हिस्सेदारी ही 9.57 हजार कोटी (1.3 बिलियन डॉलर) रुपयांच्या व्यवहारात होण्याची माहिती आहे. सध्या बिगबास्केटचे बाजारमूल्य 11.78 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.

Advertisements

मागील पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेनंतर टाटा समूह आणि बिगबास्केट यांच्यात व्यवहार धोरणावर सहमती झाली आहे. व्यवहाराच्या प्रस्तावानुसार टाटा समूह सध्या गुंतवणूकदारांसोबत जवळपास 50-60 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करण्याचे संकेत आहेत.

बिगबास्केटकडून जवळपास 18 हजारपेक्षा अधिकच्या उत्पादनांची विक्री होत आहे. यामध्ये ग्रॉस मर्चंडाइज मूल्य हे एक अब्ज डॉलरच्या घरात पोहोचल्याचीही माहिती आहे. लॉकडाऊन अगोदर फळे-भाज्यांची विक्री ही 16 ते 18 टक्क्यांवर राहिली होती ती वधारुन 20 ते 22 टक्क्यांवर पोहोचली आहे.

ऍमेझॉन-रिलायन्सला टक्कर

उपलब्ध अहवालानुसार टाटा समूहाच्या या व्यवहारातून भारतीय ई-कॉमर्समध्ये मोठी हिस्सेदारी प्राप्त करण्याचे संकेत आहेत. यामध्ये बिगबास्केटची महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे.  कारण टाटा समूह आपला सुपर ऍप लवकरच दाखल करेल. देशातील ऍमेझॉन आणि रिलायन्सच्या जिओ मार्ट यांच्याशी त्यांची टक्कर होईल.

बिगबास्केटमधील हिस्सेदारी

  • कंपनी………………….. हिस्सेदारी
  • अलिबाबा…………… 29 टक्के
  • अबराज समूह………. 16.3 टक्के
  • असेंट कॅपिटल………. 8.6 टक्के
  • हेलियॉन वेंचर पार्टनर्स   7 टक्के
  • बेसेम्मर वेंचर पार्टनर्स    6.2 टक्के
  • मिराई अस्सेट नवर आशिया        5 टक्के
  • इंटरनॅशनल फायनान्स कार्पो       4.1 टक्के
  • सँड्स कॅपिटल……… 4 टक्के
  • सीडीसी समूह  3.5 टक्के

Related Stories

इमॅक्युअर फार्मास्युटिकलचा येणार आयपीओ

Amit Kulkarni

जनरल मोटर्सला प्रकल्प विकण्यास होणार विलंब?

Patil_p

‘एल ऍण्ड टी’ला बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कंत्राट

Patil_p

इन्वेस्टमेंट पोर्टफोलियोचे मूल्य वाढल्याने बर्कशायरचा नफा तेजीत

Omkar B

आरबीआयच्या अहवालावर बाजाराची नाराजी

Patil_p

इन्फोसिसला 5 हजार कोटींचा नफा

Patil_p
error: Content is protected !!