तरुण भारत

औसा-तुळजापूर महामार्गावर चोरट्यांचा हैदोस

चाकूने जखमी करून वाहनचालकास लुटले

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / औसा

औसा-तुळजापूर महामार्गावर चोरट्यांनी धुमाकूळ घालून वाहनचालकास लुटल्याचा प्रकार घडला आहे. मध्यप्रदेशहून कर्नाटक येथे गहू घेऊन जाणाऱ्‍या ट्रकवर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत ट्रकमधील चालक व अन्य एकाला दगडाने मारहाण करीत गळ्याला चाकू लावून रोख अकरा हजार रुपये व तेरा हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड ता. औसा येथे बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

Advertisements

या प्रकरणी भादा येथील पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मोहगाव काछी, सिवनी मध्यप्रदेश राज्यातील फरीद शाह (वय ३६) व मकसुद छोटेमियाँ खान (वय ३०) हे दोघे मध्यप्रदेश येथील जबलपूरहून गहू घेऊन कर्नाटक येथे जात असताना त्यांचा ट्रक (एमएच ४० बीजी ९७५७) हा औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बेलकुंड येथे मंगळवारी (दि.1) सायंकाळी सहाच्या सुमारास बंद पडला. ट्रक सुरू होत नसल्याने पाहून दोघेही ट्रकमध्ये झोपी गेले असता बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी ट्रकवर दगडफेक करीत गाडीत प्रवेश केला व ट्रकमधील फरीद, मकसुद या दोघांना दगडाने मारहाण करीत गळ्याला चाकू लाऊन यांच्याकडील तेरा हजारांचा मोबाईल व रोख रूपये अकरा हजार रुपये घेऊन लंपास केले. या घटनेत दोघांनाही अज्ञात चोरट्यांनी जखमी केले आहेत. वांगजी पाटी ते आशिव दरम्यान तीन वाहनांवर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत त्यांना लुटल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुसरी घटना घडल्याने वाहनचालकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत पुढील तपास भादा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भारती, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक आणि त्यांची टीम करीत आहे.

Related Stories

Abhijeet Shinde

राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा; पहिलं बक्षीस ५० लाख

Abhijeet Shinde

सोलापूर शहराने ओलांडला पाच हजार पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा

Abhijeet Shinde

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर अज्ञातांनी फेकल्या पेट्रोलच्या बाटल्या

Abhijeet Shinde

साताऱयात फळविक्रेत्यांमध्ये राडा अन् तरुणांचा हैदोस

Patil_p

सातारा : जिल्ह्यात १३५ पॉझिटिव्ह, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!