तरुण भारत

जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन विशेष : …दिव्यांग सागरला मिळतोय हक्काचा निवारा

‘माणूस’ फाउंडेशनने दिले बळ

पी.जी. कांबळे / आवळी बुद्रुक

कुणी घर देता का घर? एका तुफानाला कोणी घर देता का घर.. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या छायेवाचून हिंडतय.. काय अशी आर्त हाक गेली 10 ते 13 वर्ष एका दिव्यांगाची होती. अखेर माणूस फाउंडेशनच्या मदतीने घराचे स्वप्न साकार होत आहे.

Advertisements

हा शरीराने दिव्यांग आहे पण मनाने दिव्यांग नाही. तो जगण्यासाठी रोजच लढाई करतोय. पुरोगामी चळवळीची शाहिरी गाणे गात तो आपल्या बायको मुलासोबत जीवन जगतोय. त्याची जीवन कथाही दिव्यांगत्वासारखी कठोर आहे. सागर आनंदा कांबळे असे या दिव्यांग शाहिराचे नाव. भुदरगड तालुक्यातील निष्णप या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला. तोही दिव्यांगत्व घेऊनच.

एका पायाने दिव्यांग असलेल्या सागरची घरची परिस्थिती गरिबीची होती. परिस्थितीला कंटाळून त्याच्या वडिलांनी दारूच्या नशेत आईला जाळून मारली आणि त्यानंतर आपणही आत्महत्या केली. इथेच मायेचा आधार तुटला. पुढे जगण्यासाठी सागरच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला.

आई-बाप गेले राहिली फक्त काठी आणि या काठीचा आधार घेऊन चालणाऱ्या सागरने शाहिरी गाणी जात उदरनिर्वाह सुरू केला. पुरोगामी चळवळीची फक्कड गाणी गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवू लागला. मूकबधिर असलेल्या शाहूताईशी लग्न करून सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या सागरचे घर एका पावसाळ्यात कोसळले. नशिबानं पुन्हा थट्टा सुरू केली. त्यांच्यासमोर राहण्याचा प्रश्न उद्भवू लागला. काही दिवस उघड्यावरच काढले. काही दिवस शेजाऱ्यांच्या पडवीला, तर काही दिवस सासुरवाडीला. काही दिवस पै-पाहुण्यांच्या आसऱ्याला तर काही दिवस मित्रांच्या सोबत कसेतरी काढू लागला. एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल तेरा वर्षे घरा विना अशीच गेली. तो बायको, मुलगा यांचा सांभाळ करत आहे. हक्काच्या घरासाठी झगडणाऱ्या सागरला अखेर माणूस फाउंडेशन धावून आले.

फाऊंडेशनचेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धम्मरक्षित यांनी त्यांच्या घरासाठी मदतीचे आवाहन केले. यावेळी गोड गळ्याच्या व जनजागृती करणाऱ्या सागरच्या घरासाठी माणूस फाउंडेशनवर प्रेम करणाऱ्या अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करून सागरच्या घराचे स्वप्न साकारण्याचा विडा उचला. त्यानुसार घरासाठी लागणारे सिमेंट, वाळू, चिरा, विटा, दगड व इतर साहित्य कार्यकर्त्यांनी आणून दिले आहे. सध्या त्याच्या घराचे फाउंडेशनही पूर्ण झाले असून लवकरच घराचे स्वप्न साकार होणार असल्याचा विश्वास सागर कांबळे यांनी व्यक्त केला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून गेले.

Related Stories

मिरजेत नवे 14 रुग्ण, राजकीय नेत्यासह दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

‘रडने का नही, भिडने का’; चित्रा वाघ यांनी घेतली तहसीलदार ज्योती देवरेंची भेट

Abhijeet Shinde

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे

Rohan_P

कोल्हापूर : शिरोळ नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांचा राजीनामा

Abhijeet Shinde

दिवसभरात 83,883 नवे रुग्ण

Patil_p

पंढरपुरातील ‘त्या’ हॉस्पिटलशी संबंधित 47 जण क्वॉरंटाईन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!