तरुण भारत

बुधवारी कोरोनाचे 24 नवे रुग्ण

25 हजार 114 जणांनी केली कोरोनावर मात

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बुधवारी बेळगाव शहर व जिह्यातील 24 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण बाधितांची संख्या 25 हजार 702 वर पोहोचली असून आतापर्यंत 25 हजार 114 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरांतील 16 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. महांतेशनगर, रामतीर्थनगर, वंटमुरी कॉलनी, कॅम्प, भाग्यनगर, रामनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. बुधवारी ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळून आला नाही.

आतापर्यंत 2 लाख 92 हजार 406 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 2 लाख 61 हजार 820 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असून 25 हजार 702 जणांना आजवर कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हय़ातील 341 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत जिह्यात 247 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 3 हजार 297 स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.

Related Stories

पियुसी व्दितीय परीक्षेला सुरूवात

Omkar B

भिंत कोसळून मेंढपाळ मामा-भाच्याचा मृत्यू

Patil_p

जिल्हय़ात कोरोनाचा दुसरा बळी, जनता हादरली

Patil_p

कर्नाटक: राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख पार

Abhijeet Shinde

जायंट्स सखीच्या मदतीचे पर्व पुन्हा सुरू

Patil_p

अलतगा ग्रामस्थांचा कचरा डेपोला तीव्र विरोध

Omkar B
error: Content is protected !!