तरुण भारत

शिक्षकांसाठी आजपासून विषयनिहाय कार्यशाळा

प्रतिनिधी/ बेळगाव

दहावीच्या विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन मिळावे या अनुषंगाने शिक्षण विभागातर्फे दरवर्षी शिक्षकांसाठी विषय कार्यशाळेचे आयोजन केले जाते. शाळा सुरू होताच वर्षभरात विषयनिहाय प्रत्येकी 4 मार्गदर्शनवर्ग आयोजित केले जातात. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सदर वाटचाल थांबली होती. मात्र शिक्षण विभागाने कार्यशाळा आयोजनाला हिरवा कंदील दाखवत 4 डिसेंबर ते 17 डिसेंबरदरम्यान विषयनिहाय माध्यमनिहाय कार्यशाळा आयोजित केली असून गणित विषयाने कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे.

  2020-21 हे शैक्षणिक वर्ष संभ्रमाचे असून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वाटचाल सुरू आहे. एसएसएलसीच्यादृष्टीने दरवर्षी शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाते. याअंतर्गत घटकांचे मार्गदर्शन, घटकांचे प्रश्नपत्रिकेतील स्थान, घटकनिहाय गुणांची विभागणी, अध्यापनाची पद्धत, उजळणी या विषयावर चर्चा करून अंमलबजावणी केली जाते. जुलै महिन्यापासून पहिल्या सत्रात दोन व दुसऱया सत्रात दोन कार्यशाळा होतात. मात्र यंदा कोरोनामुळे सदर कार्यशाळा लांबणीवर पडल्या असून डिसेंबर महिन्यात कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.   सदर कार्यशाळेचे वेळापत्रक शाळानिहाय मुख्याध्यापकांना देण्यात आले असून विषय शिक्षकांनी सकाळी 10 ते 5 या वेळेत कार्यशाळेचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. माध्यमनिहाय सहा विषयांच्या कार्यशाळा घेणे अपेक्षित आहे. मात्र, सदर वेळापत्रकात सर्वच विषय अंतर्भूत नाहीत. यामुळे विलंबाने सुरू झालेल्या कार्यशाळा घाईगडबडीत उरकण्यात येत असल्याचे यातून दिसून येत आहे. 

Related Stories

कॅपिटल वन संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात

Omkar B

रामतीर्थनगर येथे अभियंत्याचे घर फोडले

Patil_p

चार्टर्ड अकौंटंट्स बेळगाव शाखेला बहुमान

Amit Kulkarni

मास्क सक्तीसाठी पोलिसांचा बडगा

Patil_p

बुडाच्या व्यापारी संकुलात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान

Patil_p

नंदगड गावातील गटारीमधून घाणीचे साम्राज्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!