तरुण भारत

रुद्राक्ष विक्री-भव्य प्रदर्शन

बेळगाव  / प्रतिनिधी

हैदराबाद येथील इंडस नेपाळ रुद्राक्ष संस्थेच्यावतीने दि. 2 ते 9 डिसेंबरपर्यंत कॉलेज रोड येथील सन्मान हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या रुद्राक्षांची विक्री व प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

Advertisements

रुद्राक्षांच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्या व नैराश्य कमी होते, अशी धारणा आहे. नागरिकांना आवश्यक असणाऱया विविध प्रकारच्या रुद्राक्षांची मांडणी या ठिकाणी करण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंडस नेपाळ रुद्राक्ष संघटनेचे संचालक नरेंद्र कासीरेड्डी यांनी केले आहे.

कार्तिकमासात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष मणींना केवळ पौराणिक महत्त्वच नाही तर वैज्ञानिक प्रासंगिकतादेखील आहे. रुद्राक्षांमध्ये आध्यात्मिकरीत्या बरे करण्याचे सामर्थ्य आहे. शिवाय हृदयाचा ठोका, रक्तदाब यावर सकारात्मक प्रभाव पडतो. तणाव, चिंता, नैराश्य व उच्च रक्तदाब कमी होतो. पंचांग राशी आणि गणिताच्या माध्यमातून रुद्राक्षांचे वितरण करण्यात येत आहे. या ठिकाणी 50 रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे रुद्राक्ष उपलब्ध आहेत.

 दि. 9 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 9 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. याबाबतचा सल्लादेखील पूर्णपणे विनामूल्य देण्यात येतो. रुद्राक्षांचा दर्जाही उत्तम असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

Related Stories

मराठा बँकेवर सत्ताधारी पॅनलची सत्ता

Patil_p

जिल्हय़ात रविवारी कोरोनाचे 121 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

Amit Kulkarni

बसफेऱया कमी… प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची फरफट

Amit Kulkarni

व्हॅक्सिन डेपोत झाडे लावा; मात्र तोडलेल्या झाडांना हात लावायचा नाही!

Amit Kulkarni

उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी कामगारांची चणचण

Patil_p

पाच तोळय़ांच्या दागिन्यासह रोकड लंपास

Patil_p
error: Content is protected !!