तरुण भारत

जिल्ह्यातील शेतकऱयांना 13 लाख 12 हजारांचा वीमा परतावा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

परतीच्या पावसाने जिह्यातील भातशेतीचे नुकसान झाले आह़े यंदा पधानमंत्री पीक वीमा योजनेसाठी जिह्यातील 1 हजार 304 शेतकऱयांनी सहभाग नोंदवला होत़ा मात्र यापैकी नुकसान झालेल्या 215 शेतकऱयांनी 72 तासामध्ये नुकसानीची माहीती दिल्यामुळे या शेतकऱयांना 13 लाख 12 हजार रुपयांचा वीमा परतावा जाहीर झाल्याची माहीती कृषी विभागाने दिल़ी.

निर्सगाचा लहरीपणा व अवेळी पाउढसामुळे पीकांवर परीणाम होवून शेतकऱयांचे नुकसान होत आह़े त्यामुळे शेतकऱयांचा कल वीमा योजनेकडे वाढला आह़े यावर्षी 1 हजार 304 शेतकऱयांनी 300 हेक्टरसाठी 2 लाख 70 हजाराचा वीम्याची रक्कम भरली होत़ी संततधार व परतीच्या पावसामुळे ज्या शेतकऱयांचे नुकसान झाले त्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्प साधला होत़ा त्यामुळे पंचनामे तात्काळ होवून 13 लाखांचा वीमा परतावा शेतकऱयांना जाहीर झाला आह़े जिह्याचे उंबरडा उत्पादन जास्त असल्याने खरीप हंगामाचा परतावा पाप्त होत नव्हत़ा भातपीकासह नाचणी पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी लाभार्थी ठरले आहेत़ पीक वीम्याचा लाभ घेणारे 208 शेतकरी भात उत्पादक असून 7 शेतकरी नाचणी उत्पादक आहेत़ पीक वीम्यासाठी ऑनलाईन तकारी दाखल करण्यात येत असून 215 शेतकऱयांनी ऑनलाईन तकारी दाखल केल्या होत्य़ा.

परतीच्या पावसाने तयार भातपीकासह नाचणीचे नुकसान केले आह़े तयार पीक जमीनदोस्त झाल्याने पावसाने भाताला अंकूर फुटले त्यामुळे हा भात वाया गेला नुकसानग्रस्त शेतकऱयांचे पंचनामे करुन याबद्दलचा अहवाल वीमा कंपनीला सादर करण्यात आला त्यामुळे परतावा जिह्यातील शेतकऱयांना परतावा जाहीर झाल्याचे जिल्हा कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी सांगितल़े.

Related Stories

सातारा : दूध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात अनुदान मिळावे

triratna

वर्षभरानंतर होणार पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा

Patil_p

भक्कम पगाराची नोकरी सोडली अन् समाजसेवेसाठी अधिकारी झालो!

Patil_p

रत्नागिरी : कोकण मार्गावर गांधीधाम-तिरुनेलवेली ७ डिसेंबरपासून धावणार

triratna

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मिरजकर तिकटी येथे आंदोलन

triratna

अकरावीचा कटऑफ २.५० टक्क्यांनी वाढला

triratna
error: Content is protected !!