तरुण भारत

शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटास न्यासाची मान्यता

प्रतिनिधी / सातारा

गटास न्यासाची मान्यता

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाला सुद्धा आयुक्त, श्रमिक संघ या न्यासाची मान्यता देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राजाराम वरुटे, केशवराव जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पुन्हा एकदा शिक्षक संघ हा शिवाजीराव पाटील यांचाच यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले आहे.

Advertisements

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटास ही आयुक्त, श्रमिक संघ या न्यासाची नोंदणी मिळाली असून यापुढेही माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचे कार्य यापुढेही अखंडपणे चालू ठेवण्याचा निर्धार माधवराव पाटील, राजाराम वरुटे, केशवराव जाधव, बाळासो काळे, दि. रा. भालतडक, वसंतराव हारुगडे, मधुकर काठोळे धैर्यशील पाटील, लायक पटेल, तुकाराम कदम, विजय बहाकर, स्मिता सोहनी यांनी व्यक्त केला.

राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या २०१८ च्या आदेशान्वये शिक्षक संघटनानीही मा. आयुक्त, श्रमिक संघ या न्यासाची नोंदणी करणे बंधनकारक केलेने बहुतेक संघटनानी नोंदणी केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाने ही प्रस्ताव दाखल केला होता त्यानुसार श्रमिक संघ कार्यालयाने नोंदणी करुन मान्यता दिली आहे. त्यामूळे शिक्षक संघ हा शिवाजीराव पाटील यांचाच आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Related Stories

चौपाटीचा वाद पेटण्याची शक्यता

Omkar B

खा. उदयनराजेंनी घेतली योगी आदित्यनाथांची भेट

datta jadhav

पाटण तालुक्यातील 155 कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde

बाप्पाच्या आगमणासाठी कराडकर सज्ज

Amit Kulkarni

जिल्ह्यात 87 हजार कुटुंबांची घरकुलासाठी स्थळ पडताळणी

datta jadhav

रिपाइं स्वबळावर निवडणुका लढणार

datta jadhav
error: Content is protected !!