तरुण भारत

जेष्ठांना धोका न्युमोनियाचा

ज्येष्ठ नागरिकांना कफ, खोकला, सर्दी असे त्रास बर्याच प्रमाणात होतात. याकडे दुर्लक्ष झाल्यास पुढे जाऊन न्युमोनिया होण्याची शक्यता असते. सध्याचा संसर्गाचा काळ आणि थंडीचा मोसम यांचा विचार करता ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीमध्ये प्रदुषणही वाढते. घरात बराच काळ राहिल्याने आणि योग्य प्रकारे वायूविजन न झाल्याने श्वासाशी संबंधित आजारांचा धोका अधिक वाढतो.

न्युमोनियामध्ये फुफ्फुसात कफ साठतो, पातळ पदार्थ जमा होतात. त्यामुळे रूग्णाला श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो.

Advertisements

न्युमोनियामध्ये फुफ्फुसांच्या पेशींना सूज येते. सर्वसाधारणपणे जीवाणूजन्य, बुरशी आणि विषाणूजन्य संसर्गामुळे ही सूज येते. न्युमोनियाच्या अटॅकनंतर शरीराची प्रतिकारकक्षमता सक्रीय होते. संसर्गाशी लढण्यासाठी फुफ्फुसांमध्ये पांढर्या रक्तपेशी शरीरातील जीवाणूंना मारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे फुफ्फुसातील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात. ज्येष्ठांमध्ये न्युमोनिया हे मृत्युचे महत्त्वाचे कारण असू शकते. कोरोनामधून बर्या झालेल्या अनेक रूग्णांना न्युमोनिया होण्याचा धोका वाढू शकतो. कोरोनाच्या रूग्णांना रूग्णालयात दाखल असताना तिथे न्युमोनियाच्या जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. थंडीमध्ये फिरणे कमी होते, पौष्टिक आहार घेतला जातो पण व्यायामासाठी बाहेर न पडल्याने प्रतिकारक्षमता कमी होऊ शकते. परिणामी श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होते.

फ्लू आणि छातीचा संसर्ग यांची लक्षणे समान असतात. खूप जास्त ताप येणे, घाम येणे, कणकण, कफाचा खोकला आणि भूक कमी होणे ही त्याची सर्वसाधारण लक्षणे आहे. तसेच जोराने श्वास घेणे आणि भ्रम झाल्यासारखे वागणे ही देखील याची गंभीर लक्षणे आहेत. ही लक्षणे बहुतांश वेळा ज्येष्ठांमध्ये दिसून येतात. ज्येष्ठ व्यक्ती दीर्घ श्वास घेतात तेव्हा त्यांना छातीच्या एखाद्या भागात तीव्र वेदना होतात. फुफ्फुसांच्या बाहेरील पातळ आवरणाला सूज आल्याने या वेदना होतात.

असे असले तरी न्युमोनियातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे कमी असतात ते काही दिवसांत किंवा आठवडय़ात बरेही होतात. तर गंभीर रूग्णांना बरे होण्यास 6 महिने किंवा त्याहीपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो.

सामान्यतः छातीचा एक्सरे काढून न्युमोनियाची तीव्रता तपासली जाते. जीवाणूजन्य संसर्ग झालेला असल्यास प्रतिजैविके दिली जातात. लक्षणे गंभीर असतील तर रुग्णालयात दाखल व्हावे लागते. श्वसनास अडथळा निर्माण होत असल्यास रुग्णाला ऑक्सिजनचा सपोर्ट दिला जातो. अत्याधिक गंभीर प्रकरणात रूग्णाला व्हेंटिलेटरवरही ठेवले जावे लागू शकते.

ज्येष्ठांना वयानुरूप खोकण्याची क्षमता हळूहळू कमी होते. त्यामुळेच विषाणू किंवा जीवाणू खोकल्यावाटे बाहेर पडू शकत नाहीत. कर्करोग, हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि
मधुमेह याने ग्रस्त व्यक्ती यांना निमोनिआ होण्याचा धोका वाढतो. कर्करोगामध्ये किमोथेरेपी द्यावी लागते तसेच गंभीर तीव्र आजारांमध्ये  औषधांच्या प्रमाणामुळे रूग्णाची प्रतिकारक्षमता कमजोर होते.

बाहेर पडताना गरम कपडे घालावेत. पातळ आणि संतुलित आहार घ्यावा. धूम्रपान आणि मद्यसेवन टाळावे. वैयक्तिक स्वच्छता राखावी.

65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांनी न्युमोकोकल लसीचा डोस जरूर घ्यावा. पीसीव्ही 13 पहिल्यांदा घ्यावा. त्यानंतर एक वर्षांनी पीपीएसव्ही-23 ची लस घ्यावी. तसेच श्वसनाचे व्यायाम करावेत.

– डॉ. महेश बरामदे

Related Stories

कोरोना काळात उपयुक्त गॅजेट

Omkar B

प्लाझ्मा थेरपीचा अंतरगात

Amit Kulkarni

रक्तदाबाचा त्रास कसा ओळखाल ?

Omkar B

लाहानबाळांचा पचनसमस्या

Amit Kulkarni

बाऊ नको ; दक्षता हवी

Omkar B

चेहऱ्यावर सूज येतोय

Amit Kulkarni
error: Content is protected !!