तरुण भारत

समस्या एसीएलची

ऍन्टिरिअर क्रुसिएट लिगामेंटला (एसीएल) दुखापत होणे ही समस्या प्रामुख्याने क्रीडापटूंमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. याखेरीज जिना चढ उतार करताना किंवा बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानेही ही इजा होऊ शकते.

एसीएल म्हणजे एक अस्थिबंध असतो जो गुडघ्यापाशी असतो. गुडघा स्थिर ठेवण्यासाठी त्याची मदत होते.

Advertisements

लक्षणे कोणती?

ही समस्या प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नसल्याने अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. रूग्ण दुखापत झाली म्हणून डॉक्टरकडे जातात परंतू फ्रक्चर किंवा हाड मोडले नसल्याने ते दुर्लक्ष करतात. परंतु हळूहळू लक्षणे विकसित होतात तेव्हा रूग्णाला ती स्वतःच जाणवू लागतात. उदाहरणार्थ, चालता चालता पाय लचकणे, अचानक पाय मुडपला जाणे, पडणे, गुडघा अटकणे इत्यादी. काही रूग्णांमध्ये पाय हळूहळू बारीक आणि अशक्त होऊ लागतो.

या सर्व प्रकारच्या इजांमध्ये केवळ आर्थोस्कोपिक शस्त्रक्रिया करणे शक्य होते. त्यामध्ये शल्यचिकित्सक इजा झालेले अस्थिबंध पुन्हा तयार करतात. तांत्रिक प्रगतीमुळे आज एसीएल इजेवर इलाज करणे खूप सुलभ झाले आहे.

या शस्त्रक्रियेदरम्यान इजा झालेले अस्थिबंध काढून टाकून त्या जागी नव्या पेशी रूजवल्या जातात. या पेशी गरजेनुसार रूग्णाच्या शरीरातील एखाद्यशा अवयवातून घेतल्या जातात. बहुतांश वेळा डॉक्टर गुडघ्याच्या आसपासच्या पेशींचाच वापर करतात. त्यामुळे शस्त्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते.

कमीत कमी चिरफाड करून करण्याजोगी ही शस्त्रक्रिया आहे. त्यामध्ये दुर्बिणीचा वापर केला जातो. त्याच्या मदतीने शस्त्रक्रियेत कोणतीही गुंतागुंत होण्याचा धोका राहात नाही. शस्त्रक्रिया करताना फायबर टेप तसेच बायोडिग्रेडेबल स्क्रूचा -ज्यामध्ये धातूचा वापर केलेला नसतो- वापर करतात.

या प्रक्रियेमध्ये खूप लहानशी चीर द्यावी लागत असल्याने रुग्णाला वेदनाही फारशा होत नाहीत. तसेच रूग्ण वेगाने बरा देखील होतो. त्यामुळे ही अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय प्रक्रिया आहे.

सुमारे 1 महिन्यात कोणत्याही आधाराशिवाय चालायला सुरूवात करतो.

पाच महिन्यांनंतर व्यक्ती पुन्हा पूर्ववत क्रीडा प्रकार करू शकते.

काही रूग्णांमध्ये शस्त्रक्रियेविनाही रूग्ण बरा होऊ शकतो. यासाठी फिजिओथेरेपीच्या माध्यमातूनही अस्थिबंधाच्या इजेवर काही प्रमाणात उपचार करता येऊ शकतात.

– डॉ. संतोष काळे

Related Stories

मुलांमधील बध्दकोष्ठता

tarunbharat

रक्तदाबाचा त्रास कसा ओळखाल ?

Omkar B

डायव्हर्टिक्युलायटिस आणि पथ्याहार

Omkar B

कॅफिन आणि आरोग्य

Amit Kulkarni

चपलेतून विषाणूप्रसार ?

Omkar B

हनुमानासन

Omkar B
error: Content is protected !!