तरुण भारत

झोप कमी, माधुमेहाची हमी !

मध्यंतरी करण्यात आलेल्या संशोधनामधून संशोधकांना असे आढळून आले आहे की, जे लोक दररोज पाच तासांचीच झोप घेतात त्या टाइप-2 डायबिटिसच्या कचाटय़ात येण्याची शक्यता पाचपटीने अधिक असते. ते म्हणतात की, चांगल्या स्वास्थासाठी कमीत कमी सात तासांची झोप जरूरी आहे; परंतु आजच्या या बदलत्या लाईफ स्टाईलने इतक्या तासांची झोप घेणे शक्य होत नाही.

ङशोधकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, अधिक झोपण्याने अथवा फार कमी झोप घेण्याने हार्मोनमध्ये काही असे बदल येतात ज्यामुळे मेटाबॉलिजम आणि भुकेवर कंट्रोल राखण्याची प्रक्रिया यावर परिणाम होतो.

Advertisements

ङसंशोधनादरम्यान वैज्ञानिकांना आढळून आले आहे की, जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात. त्यात ग्लुकोज फास्टिंगला प्रभावित करणारी व्याधी उत्पन्न होते; तर जे लोक दहा ते आठ तासांची झोप घेतात. त्यात या आजाराच्या कचाटय़ात येण्याचा धोका कमी असतो.

ङकमी झोपल्याने सकाळच्या वेळी इन्सुलिन घटल्याने, शुगर लेवल वाढते. ङया शोधप्रकल्पाच्या
प्रमुख आणि न्यूयॉर्कमधील बफॅलो युनिव्हर्सिटीच्या संशोधक लीजा राफाल्सन यांच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत असे मानले जात होते की, डायबिटिस होण्यासाठी अन्य कारणांबरोबरच आनुवंशिक कारणेही असतात आणि खास प्रकारचे जीन्स असलेले लोक डायबिटिसच्या कचाटय़ात येतात; परंतु ताज्या शोधातून आढळून आले आहे की, योग्य प्रकारे पूर्ण झोप न घेण्याने हा आजार होऊ शकतो.

Related Stories

शामान्य सर्दी-खोकला झाल्यास….

Omkar B

समस्या ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिसचा

tarunbharat

समस्या नखे तुटण्याची

Amit Kulkarni

धोका फुप्फुसच्या कर्करोगाचा

Omkar B

चेहऱ्यावर सूज येतोय

Amit Kulkarni

कोरोना आणि लोहकण

Omkar B
error: Content is protected !!