तरुण भारत

शिगेलोसिस म्हणजे काय ?

कोरोनामुळे जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणार्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. पण केवळ कोरोनासाठीच नव्हे तर हात धुतल्याविना भोजन घेणे हे स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत नुकसानदायक ठरू शकते. कारण खराब हातांच्या कारणाने कित्येक किटाणू आणि बॅक्टेरिया मुखाद्वारे शरीरात जातात आणि शिगेलोसिससारख्या आजारांचे कारण बनतात.

शिगेलोसिस हे आहार आणि स्वच्छता यामधील निष्काळजीपणाच्या कारणाने मोठय़ा आतडय़ात होणारे एक संक्रमण आहे. हे संक्रमण शिगेला बॅक्टेरियाच्या कारणाने होते.

Advertisements

काही लोकांमध्ये शिगेला बॅक्टेरियाच्या संक्रमणाचे कोणतेच लक्षण दिसून येत नाही. तर या संक्रमणाच्या कचाटय़ात येणारे काही रूग्ण ताप अथवा हलकेसे जुलाब होणे यांसारख्या समस्यांनी पीडित होतात.

या संक्रमणाने पीडित जवळजवळ 25 टक्के रूग्णांत तीव्र ताप, पोटात अखडल्यासारखे होणे आणि गंभीर जुलाब यांसारख्या तक्रारी दिसून येतात. अशा रूग्णांना दररोज 10 ते 30 वेळा शौचाला जावे लागते.

शिगेला बॅक्टेरिया पाचनतंत्रावरच नव्हे तर शरीराच्या अन्य भागांवरही परिणाम करतात. परंतु असे होण्याची संभावना नसल्यासारखी असते.

एका अनुमानानुसार जगभरात जवळजवळ 140 कोटी लोक प्रत्येक वर्षी शिगेलोसिस संक्रमणाचे शिकार होतात. यांपैकी जवळजवळ सहा लाख रूग्णांचा मृत्यूही होतो.

Related Stories

तपासा तुमची ऑक्सिजन पातळी

Amit Kulkarni

शिशूचे मौखिक आरोग्य

tarunbharat

वरुण मुद्रा

Omkar B

मुकाबला डयबेटिस न्यूरोपॅथीचा

Omkar B

ग्रीन टी की लेमन टी

Omkar B

व्याधी टॉन्सिल्सची

Omkar B
error: Content is protected !!