बौद्ध विहारमध्ये होणार कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 5 व 6 डिसेंबर रोजी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता सदाशिवनगर येथील बौद्ध विहारमध्ये कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे.
दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा व विविध बहुजन संघटनांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मानवंदना व मालार्पण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 9.30 वाजता सदाशिवनगर येथील बौद्ध विहारमध्ये बाबासाहेबांना मानवंदना व मालार्पण कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर बुद्ध वंदना, धम्म वंदना, भीमस्तुती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषणे होणार आहेत. तरी या महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी बौद्ध बांधव व बहुजन कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे प्रा. के. डी. मंत्रेशी व मल्लेश चौगुले यांनी केले आहे. कार्यक्रमाला येताना सर्वांनी मास्क वापर व सामाजिक अंतर पाळायचे आहे.