तरुण भारत

मराठीतूनच निवडणुकीची कागदपत्रे द्या

तालुका म. ए. समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव

ग्राम पंचायत निवडणूका जाहीर झाल्यानंतर तातडीने निवडणूक आयोगाने कागदपत्रे देण्यास सुरूवात केली. मात्र ही कागदपत्रे केवळ कन्नड भाषेमध्ये असल्यामुळे मराठी भाषिकांना उमेदवारी अर्ज भरणे अवघड जाणार आहे. तेंव्हा तातडीने सीमाभागामध्ये मराठीत परिपत्रके उपलब्ध करा, अशी मागणी तालुका म. ए. समितीतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

सीमाभागामध्ये 25 लाख मराठी भाषिक राहतात. बेळगाव, खानापूर, चिकोडी आणि निपाणी तालुक्मयात तर 50 टक्क्मयांहून अधिक मराठी भाषिक राहतात. त्यामुळे त्यांना मराठी भाषेतूनच उमेदवारी अर्ज तसेच इतर कागदपत्रे द्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवडणुकीतून माघार घेण्याचे अर्ज तसेच इतर कागदपत्रे मराठीमध्येच द्यावेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.

22 डिसेंबर व 27 डिसेंबर अशा दोन टप्प्यामध्ये ही निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 7 डिसेंबर पासून अर्ज भरायचा आहे. तेंव्हा केवळ दोन दिवसांतच ही कागदपत्रे द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस एल. आय. पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. शाम पाटील, आर आय. पाटील, कल्लाप्पा घाटेगस्ती, बी. डी. मोहनगेकर, संजय मंडलीक, कृष्णा हुंदरे, दुद्दाप्पा बागेवाडी, विलास घाडी, परशराम कणबरकर, सतीश देसूरकर, रमेश मेणसे, प्रकाश मालुचे, कृष्णा शहापूरकर, अशोक धामणेकर, विवेग सुळगेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भात खरेदीसाठी केंद्र सुरू करा

सध्या भाताची सुगी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. मळणी करुन शेतकरी भात विक्री करत आहेत. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकरी भात विक्री करत असताना एजंट लोक कमी दरामध्ये भात खरेदी करत आहेत. तेंव्हा तातडीने बेळगावमध्ये भात खरेदी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी देखील करण्यातआली आहे.

भाताला किमान 1868 रुपये सरकारी दर आहे. मात्र भात खरेदीदार अत्यंत कमी दरामध्ये भात खरेदी करत आहेत. भात खरेदी, विक्री फेडरेशनकडे हे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी 30 डिसेंबर पासून भात खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

आठवडी बाजारात सोशल डिस्टन्सचा फज्जा

Patil_p

खडकलाट येथे राजू यादव यांचा स्मृतिदिन गांभीर्याने

Patil_p

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा हतबल

Patil_p

‘त्या’ नराधमांना जन्मठेप, 25 लाखाचा दंड

Omkar B

बिम्सला गर्भवती बाधितांना डिस्चार्ज देण्याची घाई

Patil_p

बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Rohan_P
error: Content is protected !!