तरुण भारत

शिक्षक बदलीसाठी जिल्हय़ात 2 हजार 927 अर्ज

प्रतिनिधी/ बेळगाव

शिक्षक बदली प्रक्रिया विलंबाने का होईना राबविण्यात येत असून बदली प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक शिक्षकांनी यासाठी अर्ज केला आहे. 30 नोव्हेंबर ही बदलीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख होती. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून एकूण 2 हजार 927 शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असून राज्यात 69 हजार शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत.

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून प्रामुख्याने 2 हजार 315 शिक्षक विनंतीनुसार बदली प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. तर परस्पर बदलीसाठी 256 शिक्षकांनी अर्ज केले आहेत. शिवाय 256 शिक्षक सक्तीच्या बदली प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत. कोरोनामुळे सदर बदली प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मात्र अर्ज पडताळणी, बदलीची यादी, कौन्सिलिंग पूर्ण करत डिसेंबरअखेर बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात येण्याची शक्यता आहे.

Related Stories

दिवाळीत फटाके उडविण्यावर निर्बंध येण्याची चिन्हे

Patil_p

लॉकडाऊनचा फटका शेतकऱयालाही

Patil_p

वडगाव रस्त्यावरील खड्डे कधी बुजणार?

Patil_p

खरेदी करताना अधिक घेतलेला कर परत द्या

Omkar B

राज्यात 161 नवे रुग्ण : 164 जणांना डिस्चार्ज

Patil_p

केळकर बाग येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

sachin_m
error: Content is protected !!