तरुण भारत

मळेकरणी क्रेडिट सौहार्द सोसायटीची 26 वी वार्षिक सभा खेळीमेळीत

z`

उचगाव येथील मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी सोसायटीची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थापक चेअरमन जवाहर देसाई होते.

यावेळी मळेकरणी देवीच्या फोटोचे पूजन चंद्रकांत देसाई, दीप प्रज्वलन संचालक किशोर पावशे, निळकंठ कुरबुर, मारुती सावंत, शालू फर्णांडीस, प्रविणा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक व स्वागत तसेच अहवाल वाचन बाळकृष्ण देसाई यांनी केले. यावेळी सभासदांना 8 टक्के लाभांश जाहिर करण्यात आला.

ज्येष्ठ नागरिक अर्जुन जुवेकर, लक्ष्मण शिंदोळकर, यल्लाप्पा चोते यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्त सैनिक उत्तम घुमटे, चाळोबा घुमटे, मारुती देसाई, अब्दुलहमीम ताशिलदार यांचाही सत्कार करण्यात आला.

सन 2019-20 सालात माध्यमिक विभागात एस. एस. एल. सी. परिक्षेत उचगाव केंद्रात क्रमांक पटकाविलेल्या मुक्ता शिंदोळकर, सरिता सावंत, अनुराधा पाटील यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला रमेश घुमटे, लुमाण्णा उर्फ बाळासाहेब पावशे, शंकर पाटील, श्रीराम बेनके, यल्लाप्पा शिंदोळकर, सुषमा देसाई उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळकृष्ण देसाई यांनी केले. मॅनेजर के. एन. कदम व संचालिका प्रविणा देसाई यांनी आभार मानले.

Related Stories

ओव्हर ब्रिजवरील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

हिंडलगा, बेनकनहळ्ळी परिसरात काळा दिन गांभीर्याने

Patil_p

दुर्गमभागाच्या विकासासाठी लोकमान्य प्रयत्नशील

Patil_p

कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षा अष्टेकर दांपत्याकडून भाजीपाला वितरण

Patil_p

हुतात्म्यांना आज अभिवादन

Patil_p

निपाणी महाराष्ट्रात यावी हीच इच्छा

Patil_p
error: Content is protected !!