तरुण भारत

वॉशिंगमशिन दुरुस्तीसाठी आले…अन् लाखांचे दागिने पळविले

शिवाजी कॉलनी,टिळकवाडी येथील घटना, दोघा जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव

वॉशिंगमशिन रिपेरीसाठी म्हणून घरात आलेल्या दोघा जणांनी साडेतीन लाखांचे दागिने पळविल्याची घटना गेल्या पाच दिवसांपूर्वी शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी टिळकवाडी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून दागिने व रोकड जप्त करण्यात आली आहे.

मारुती परशराम जाधव (वय 26, रा. विशाल गल्ली, कंग्राळी खुर्द), शुभम राजू भातकांडे (वय 25, रा. वैभवनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, पोलीस उपनिरीक्षक एन. वाय. कारीमनी, पोलीस उपनिरीक्षक मणीकंठ पुजारी, प्रभाकर भुसी, सुर्यकांत बाबण्णावर, अक्षय महेंद्रकर, रमेश अक्की आदींनी ही कारवाई केली आहे.

30 नोव्हेंबर रोजी शोभा गुरुराव कातवटे यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. वॉशिंगमशिन रिपेरीसाठी म्हणून मारुती व शुभम हे आपल्या घरात आले. आपल्याला बेशुद्ध करुन मंगळसूत्र, सोन्याची चेन, बांगडय़ा व त्यांचे पती गुरुराव यांना जखमी करुन त्यांच्या गळय़ातील चेन, बोटातील अंगठय़ा व 25 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे, असे फिर्यादित नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणी मारुती व शुभम या दोघा जणांना अटक करुन त्यांच्याजवळून गुन्हय़ासाठी वापरलेली एक मोटारसायकल, 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या जोडगोळीने आणखी कोठे गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यात येत आहे.

Related Stories

वसाहत योजना राबविण्यास पिकावू जमिनी देणार नाही

Patil_p

निवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांचा सत्कार

Patil_p

अखेर कणबर्गीत झाली पिण्याच्या पाण्याची सोय

Omkar B

एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे भाषा

Patil_p

लॉकडाऊन शिथिलनंतर चोऱया वाढल्या

Patil_p

दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार

Patil_p
error: Content is protected !!