तरुण भारत

पहिला वनडे सामना लांबणीवर

वृत्तसंस्था/ केपटाऊन

यजमान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील शुक्रवारी होणारा पहिला वन डे सामना क्रिकेटपटू कोरोनाबाधित आढळल्याने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिका खेळविली जात आहे. यजमान संघातील एका खेळाडूची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळल्याने दोन्ही देशांच्या क्रिकेट संघटनांनी हा वन डे सामना लांबणीवर टाकण्याचा निर्णय एकमताने घेतला. आता हा पहिला वन डे सामना येत्या रविवारी खेळविण्यात येणार आहे. कोरोनाबाधित क्रिकेटपटूचे नाव मात्र घोषित करण्यात आलेले नाही. इंग्लंडच्या या दक्षिण आफ्रिका दौऱयामध्ये आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचे तीन क्रिकेटपटू कोरोनाबाधित आढळले आहेत. इंग्लंडने या दौऱयात टी-20 मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली आहे. वन डे मालिकेतील पहिला सामना रविवारी पर्लच्या बोलँडपार्क मैदानावर खेळविला जाणार असून या मालिकेतील शेवटचे दोन सामने केपटाऊनमध्ये खेळविले जातील.

Related Stories

Tokyo Paralympics : भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी; सेमी फायनलमध्ये एन्ट्री

Rohan_P

विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या चार जणांची निवड

Patil_p

शॅपोव्हॅलोव्हला कोरोनाची लागण

Patil_p

फॉर्म गवसलेल्या चेन्नईसमोर कार्तिकच्या नेतृत्वाची कसोटी

Patil_p

भगत, कृष्णा, तरुण पॅरालिम्पिक्स बॅडमिंटनसाठी पात्र

Patil_p

ओकिफ प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p
error: Content is protected !!