तरुण भारत

अँथोनी फुकी यांच्याकडून क्षमायाचना

‘फिझर बायोएनटेक या कंपनीच्या लसीला मान्यता देण्यात ब्रिटीश सरकारने घाई केली’ या स्वतःच्या विधानाबद्दल अमेरिकेतील सांसर्गजन्य विकारांचे जागतिक मान्यताप्राप्त तज्ञ अँथोनी फुकी यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सर्व संबंधितांची क्षमायाचनाही केली. असे विधान केल्याने लसीसंबंधी संशयाचे वातावरण निर्माण झाले. मात्र तसे करण्याचा हेतू नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले.

फिझर लसीच्या गुणवत्तेसंबंधी आपण निश्चिंत आहोत. आपले विधान केवळ काळजीपोटी करण्यात आले होते. कोरोना लसीसंबंधात आता अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे गुणवत्तेची कोणतीही तडजोड कोणीही करू नये असे सांगण्याचा आपला प्रयत्न होता. तथापि आपल्या विधानाचा विपरीत अर्थ लावला गेला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनांमध्ये किंतु निर्माण झाला, याचा खेद होतो, अशा शब्दांमध्ये त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खेद व्यक्त केला.

अमेरिकेत अधिक वेळ

अमेरिकेत कोणत्याही लसीला अंतिम मान्यता देण्यास विलंब लागतो. येथील प्रक्रिया ब्रिटनपेक्षा मंद आहे, असे फुकी यांनी स्पष्ट केले. तथापि, ब्रिटनने मान्यता दिलेली लस गुणवत्तेच्या दृष्टीने चोखच असेल असा आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

शंकेमुळे चिंता

फित्झरच्या लसीसंबंधी फुकी यांनी व्यक्त केलेल्या शंकेमुळे जगभरात संशय निर्माण झाला होता. भारतासह अनेक देश ही लस विकत घेण्यासाठी व तिचे उत्पादन आपल्या देशात करण्यासाठी सज्ज आहेत. या देशांमध्येही काहेसा संदेह निर्माण झाला होता. त्यामुळे फुकी यांचे ताजे विधान महत्वपूर्ण मानण्यात येते.

Related Stories

पाकचा नवीन नकाशा; काश्मीर, जुनागढवर ठोकला दावा

datta jadhav

पाकिस्तानात संगमरवराची खाण कोसळून 19 ठार

datta jadhav

दक्षिण कोरियात रूग्णवाढ

Patil_p

फ्रान्सचा मालीमध्ये एअर स्ट्राईक; 50 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

हिंदू मंदिर पाडल्याप्रकरणी पाकमध्ये आणखी 45 जणांना अटक

datta jadhav

बायडेन प्रशासनात ‘महिला राज’

datta jadhav
error: Content is protected !!