तरुण भारत

भारताचा रशियाबरोबर नौदल सराव

हिंदी महासागरात दोन्ही देशांच्या युद्धनौका उपस्थित, क्षेपणास्त्रयुक्त नौकेचाही उपयोग, दोन दिवस सराव चालणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांच्या नौदलांबरोबर मलबार मोहिमेंतर्गत केलेल्या कवायतींनंतर आता भारताने रशियाबरोबर नौदल युद्धाभ्यास चालविला आहे. दोन दिवस चालणाऱया या युद्धाभ्यासाचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. या कवायती हिंदी महासागरात सुरू करण्यात आल्या आहेत.

भारताने या युद्धाभ्यासासाठी आयएनएस शिवालिक आणि पाणबुडीविरोधी युद्धनौका उपयोगात आणल्या आहेत. आयएनएस शिवालिक ही युद्धनौका गाईडेड क्षेपणास्त्रयुक्त असून ती रडारवर दिसत नाही. याशिवाय आणखी काही छोटय़ा युद्धनौका या सरावात भाग घेत आहेत. रशियानेही त्याची दोन मोठय़ा युद्धनौका पाठविल्या आहेत.

युद्धनौकांशिवाय भारताने सागरी हेलिकॉप्टर्स आणि विशेष प्रकारचे अग्निबाणही सरावासाठी आणले आहेत. हा सराव ‘पॅसेज एक्झरसाईज’ या स्वरुपाचा आहे. शत्रूच्या जहाजांची कोंडी करण्यासाठी तो केला जातो. भारताच्या नौदलाची मारक क्षमता वाढविणे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे.

नेहमी विदेशांबरोबर सराव

भारतीय नौदलाच्या युद्धनौका वर्षात किमान दोन वेळा विदेशी युद्धनौकांसमवेत युद्धाभ्यास करतात. यातून आपली बलस्थाने आणि त्रुटीही नौदलाच्या लक्षात येतात. त्यानंतर त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच बलस्थाने अधिक भक्कम करण्यासाठी उपाययोजना केली जाते, अशी माहिती देण्यात आली.

‘इंद्र’ सराव

भारताचे नौदल रशियाबरोबर दर दोन वर्षातून एकदा ‘इंद्र’ नामक मोहिमेंतर्गत युद्धसराव करते. यावषी सप्टेंबरमध्ये असा सराव करण्यात आला होता. सध्या चीनबरोबर भारताचे संबंध कमालीचे ताणले गेल्याने भारताने आपली तिन्ही सेना दले युद्धसज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रशियाबरोबर याचवषी सलग दुसऱयांदा नौदल युद्धसराव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हिंदी महासागरात चीनने आव्हान उभे केल्याने भारतासह अमेरिका व इतर देशांनीहीं या भागात जोरदार सज्जता केली आहे.

Related Stories

किचनचा पाईप दुरुस्त करण्यासाठी 4 लाखांची मागणी

Patil_p

युद्धासाठी सज्ज व्हा; जिनपिंग यांचे सैनिकांना आवाहन

datta jadhav

ग्रंथालयातून लोकशाहीवादी पुस्तके हटवा, हाँगकाँग प्रशासनाचे आदेश

datta jadhav

अमेरिकेत 46 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

ट्रम्प यांना विषाचे पाकीट पाठवणाऱ्या महिलेस अटक

datta jadhav

पाकिस्तानात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 702 वर

Rohan_P
error: Content is protected !!