तरुण भारत

सेन्सेक्सची प्रथमच 45,000 वर झेप

सेन्सेक्स 446 अंकांनी मजबूत : गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजाराने नवा उच्चांक नोंदवला आहे. बीएसई सेन्सेक्स प्रथमच 45,000 वर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरणासंदर्भात झालेल्या बैठकीतील रेपो रेट जैसे थे ठेवण्याच्या बातमीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात सकारात्मक झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरात प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्स नवीन विक्रम नोंदवत बंद झाला आहे.

आरबीआयने बाजारात महागाईचा वाढता कल पाहून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून सदरचा रेपोदर 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. यासह वर्ष 2020-21 या कालावधीमध्ये आर्थिक विकासदर (जीडीपी) 7.5 टक्क्यांच्या घसरणीवर राहणार असल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. ऑक्टोबरमध्ये जीडीपी 9.5 टक्क्यांनी घसरणार असल्याचाही अंदाज व्यक्त केला होता. परंतु दोन महिन्यांमध्ये हा घसरणीचा अंदाज 2 टक्क्यांनी कमी आल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह राहिल्याने शुक्रवारी याचा लाभ भारतीय भांडवली बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले आहे.  

दिग्गज कंपन्यांच्या साथीने दिवसअखेर सेन्सेक्स 446.90 अंकांनी वधारुन  निर्देशांक 45,079.55 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 124.65 नी मजबूत होत निर्देशांक 13,258.55 वर बंद झाला
आहे.

दोन्ही निर्देशांकांनी मजबूत कामगिरी केल्याने दिवसभरातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने काही काळ 45,148.28 आणि निफ्टीने 13,280.05 चा उच्चांकी टप्पा गाठल्याची नोंद केली आहे. शुक्रवारी बाजारातील बँकिंग समभागांनी मोठी मजल मारली असून यांचा निफ्टी निर्देशांक 603 अंकांच्या मजबुतीसह 30,052 वर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात उत्साह दाखवला आहे.

Related Stories

एचडीएफसी लाइफ नफ्यात

Patil_p

एचसीएलकडून डीडब्ल्यूएसचे अधिग्रहण

Patil_p

वाहन क्षेत्र निराश !

Omkar B

धान्य खरेदी 21 टक्क्यांनी वाढली

Patil_p

विमा क्षेत्रात विदेशी कंपन्यांची हिस्सेदारी फायद्याची

Patil_p

34.57 टक्क्मयांची निर्यातीत घसरण

Patil_p
error: Content is protected !!