तरुण भारत

पुणे, नागपूर बालेकिल्ले भाजपने गमावले!

महाआघाडी स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे सरकारने आपली शक्ती दाखवून दिली. दुहीने बेजार भाजपने आपले पुणे, नागपूरसारखे सांस्कृतिक बालेकिल्ले गमावले हे मोठे अपयश आहे.

विधान परिषद निवडणुकीचा पहिलाच निकाल महाआघाडीच्या बाजूने अपेक्षेहून घवघवीत लागल्याने तिन्ही पक्षांच्या विश्वासात वाढ होणार आहे, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील या जोडगोळीला  पक्षांतर्गत विरोधकांच्या मोठय़ा आव्हानाबरोबरच तिन्ही पक्षांच्या एकजुटीचे आव्हान निर्माण होणार आहे. 

विदर्भात काँग्रेसने पुन्हा उचल घेतल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना  महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सुस्थापित करण्याची शक्मयताही या निकालाने निर्माण झाली आहे. ज्ये÷ नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारल्याचे हे चिन्ह असल्याचे म्हटले आहे, तर या शक्तीचे आकलन करण्यात चूक झाली हे फडणवीस यांनी मान्य केले आहे. चाळीस वर्षांची परंपरा असणारा नागपूरचा पदवीधर मतदारसंघ आणि तशीच परंपरा असणारा पुण्याचा मतदारसंघ गमावल्याने देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रति÷sला धक्का पोहोचला आहे. रा.स्व.संघ आणि भाजप यांच्यादृष्टीने पुणे आणि नागपूरचे राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व खूपच आहे असे असताना हे मतदारसंघ गमावले हे मोठे अपयश आहे. याचे वर्णन सुधीर मुनगंटीवार यांनी झोपलेल्या सशाबरोबर तर खडसेंनी फाजीलपणा आणि अहंकार असे केले. त्याचे संदर्भ गडकरींच्या अलीकडील एका भाषणात आहेत.

औरंगाबाद मतदारसंघातील पंकजा समर्थकाची झालेली बंडखोरी ही तर डोकेदुखीच. पुणे मतदारसंघात संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी दिल्याने नाराज इच्छुक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा ‘सिंगल वोटिंग’चा आदेश तर मानला मात्र आपल्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे मत देण्याऐवजी नावापुढे तीन आकडा लिहिला आणि पक्षाची रणनीती खचवली. मराठवाडा आणि पुण्यातील ही बंडखोरी सहजासहजी झालेली नाही. पण कोल्हापुरातून आघाडीचे अरुण लाड यांना मिळालेली मते म्हणजे मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या अस्तित्वाला दिलेले आव्हानच आहे. नाही म्हणायला भाजपची शान राखली ती काँग्रेसमधून येऊन उमेदवारी पटकावलेल्या धुळे-नंदुरबारच्या अमरीश पटेल यांनी. काँग्रेसचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि मतांची गोळाबेरीज करण्यात तरबेज म्हणून प्रसिद्ध असणाऱया पटेल यांनी व्यक्तिगत शक्ती वापरून महाआघाडी सरकारला धक्का दिला. भाजप नेते गिरीश महाजन यांनी याबद्दल केलेले ट्विट आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडाल्याबद्दल व्यक्त केलेला आनंद भाजपचे इतर नेते टिकवू शकले नाहीत. महाजन यांना आनंद होणे स्वाभाविक होते. नुकताच पक्ष सोडून राष्ट्रवादीत गेलेले ज्ये÷ नेते एकनाथ खडसे आणि अनिल गोटे निवडणुकीवर काही प्रभाव दाखवू शकले नाहीत. उत्तर महाराष्ट्रावर आपलेच वर्चस्व आहे हे त्यांना ठसवता आले. शिवाय खडसे यांच्या प्रयत्नानंतर रायसोनी पतसंस्थेच्या मालमत्ता कमी भावाने कार्यकर्त्यांना खरेदी करायला लावून नंतर ते पत्नीच्या नावाने वर्ग केल्याचे प्रकरण सध्या बरेच गाजते आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.  त्यामध्ये झंवर यांच्यासह महाजन यांच्या अनेक कार्यकर्त्यांची झाडाझडती, घरांवर छापे पडण्याची चिन्हे आहेत. आर्थिक गुन्हे शाखा लवकरच जळगावात पोचणार असल्याने त्यापूर्वी एखादा धमाका करणे महाजनांना आवश्यक होते. तो अमरिश पटेल यांनी त्यांना करू दिला.

 अमरावती शिक्षक मतदारसंघातील निकाल शिवसेनेला विचार करायला लावणारा आहे. सेना उमेदवार आणि विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे उमेदवार नितीन धांडे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात काँग्रेसच्या माजी आमदार मालतीबाई सरनाईक यांचे पुत्र असलेले आणि अमरावतीच्या शिक्षण संस्था मंडळाचे अध्यक्ष असलेले किरण सरनाईक यांनी सर्वांनाच मागे सारत आमदारकी पटकावली.

 या पराभवाबद्दल शिवसेनेला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आम्हाला एक जागा मिळाली, ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांना तेवढीही नाही असे म्हणण्याची संधी माजी मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिली आहे.

 भाजपा विधान परिषदेच्या या निकालांकडे डोळे लावून बसली होती.

112 आमदार पाठीशी असताना ठाकरे सरकारने एक वर्ष पूर्ण केले आणि आपल्या एकामागून एक तारखा खोटय़ा ठरल्या त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधून आलेली 40 पेक्षा अधिक घराणी परतीच्या मार्गावर लागतील की काय याची त्यांना चिंता आहे.  माजी खासदार जयसिंगराव पाटील यांच्या जाण्याने भाजपचे आउटगोइंग सुरू होईल असे म्हटले जात असताना हा निकाल आला आहे. त्याचा परिणाम भाजप महाराष्ट्रात  निवडणुकांनंतर पूर्ण ताकतीने लक्ष घालेल आणि ऑपरेशन लोटस राबवेल असे म्हटले जात होते त्यावर होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर खात्याची आलेले नोटिस किंवा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुलाला इडीने ताब्यात घेण्याची केलेली कारवाई म्हणजे केंद्राच्या कारवाया महाराष्ट्रात सुरू झाल्याचे चिन्ह मानले जात होते.

 मात्र त्याचवेळी कॅगने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेप नोंदवलेला जलयुक्त शिवार आणि गिरीश महाजन यांच्या चौकशीने सत्ताधारी पक्षाने, आयुधे राज्य सरकारकडे सुद्धा आहेत असे दाखवले आहे.   हेच मुद्दे घेऊन आता मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे त्यावर सावट असेल ते भाजपाच्या हक्काच्या मतदारसंघातील पराभवाचे. भाजपचा हा पराभव मतपत्रिकेद्वारे मतदान झाल्याने झाला आहे. इव्हीएममध्ये भाजप जिंकते असा प्रसार होण्याची शक्मयता आहे.

शिवराज काटकर

Related Stories

मराठा आरक्षणाला स्थगितीने तणाव वाढला!

Patil_p

बिहारमधील निवडणुकीत चमत्कार होणार काय?

Patil_p

यालागीं न वचें कौंडिण्यपुरा

Patil_p

विज्ञानापलीकडील श्रेष्ट विज्ञान

Patil_p

समदुःखी एकत्र येतील ?

Patil_p

कोरोना काळात कवींची भीती

Patil_p
error: Content is protected !!