तरुण भारत

कास रस्त्यावर कार दरीत कोसळून युवती ठार

गणेश खिंडीतील घटना :  शिवेंद्रराजे ट्रेकर्सकडून मदतकार्य

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

कास हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असले तरी तिकडे जाणारा रस्ता तेवढा सोपा नाही. वाहने चालवताना काळजी घ्यावीच लागते. थोडी चूक झाली तरी मग गाडी थेट दरीत जाते व दुर्देवी घटना घडू शकते. अशीच दुर्देवी अपघाताची घटना शुक्रवारी सातारा ते कास रस्त्यावर गणेश खिंडीत घडली असून एक अल्टो कार 150 ते 200 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक युवती कारच्या बाहेर फेकली गेल्याने जागीच ठार झाली तर तिच्या समवेत असलेले दोघेजण युवक किरकोळ जखमी झाले आहेत.

कोमल बापूराव पाटील (वय 25 मूळ रा. बोरखळ, ता. सातारा सध्या रा. मार्केटयार्ड, सातारा) असे अपघातात मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका कारमधून युवतीसह तिघेजण कास बाजूकडून साताऱयाकडे येत असताना गणेश खिंडीत हा अपघात घडला आहे. दुपारी पावणेचारच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना ही घटना कळवल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी समीर महांगडे, महाले यांच्यासह जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने शिवेंद्रराजे ट्रेकर्सला ही घटना रेस्क्यू क्रमांकावर कळवल्यानंतर ट्रेकर्स तातडीने रवाना झाले.

गणेश खिंडीत कार (क्रमांक एम. एच. 12 जीएफ 0179) उरमोडीच्या बाजुकडील दरीत कोसळली होती. शिवेंद्रराजे ट्रेकर्सची रेस्क्यु टीम तिथपर्यंत पोहोचली तेव्हा कारमध्ये दोघेजण आढळून आले. ते किरकोळ जखमी होते. त्यांना पोलीस, ग्रामस्थांच्या सहकार्याने ट्रेकर्सनी बाहेर काढले तर नंतर कारमध्ये युवतीही होती, अशी माहिती समोर आली. ती युवती कारमधून फेकली गेल्याने दरीत कारपासून काही अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला. युवतीचा मृतदेह देखील ट्रेकर्सनी वर काढला व सायंकाळी उशिरा दोन जखमींसह युवतीला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातातील जखमी युवकांना खासगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. तर कार वर काढण्याचे कामही रात्री उशिरापर्यंत सुरु होते. कास रस्त्यावर फिरायला जाणाऱयांनी मात्र काळजी घेण्याची गरज किती आवश्यक आहे हे या अपघातामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Related Stories

‘त्या’ वनकर्मचाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयातही फेटाळला

triratna

सातारा नगर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे फेरीवाल्यांचे नुकसान : आ. शिवेंद्रसिंहराजे

triratna

..अन् ते अतिक्रमीत शेड काढून घेण्याचा शेड मालकाचा उपनगराध्यक्षांना शब्द

Shankar_P

माढा तालुक्यात पाच कोरोनाबाधितांची भर

triratna

कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूरात प्रतिदिन 1500 भाविकांना विठ्ठल दर्शन

triratna

दिलासा : मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर!

pradnya p
error: Content is protected !!