तरुण भारत

शेतकरी-सरकारमध्ये पाचवी बैठक सुरू; कायदा मागे घेण्यावर शेतकरी ठाम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

नवीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर  ठाण मांडून आहेत. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेची पाचवी फेरी सुरू झाली असून, सरकारच्या वतीने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि पीयूष गोयल विज्ञान भवनात शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. 

सरकारशी वाटाघाटी करण्यासाठी शेतकरी प्रतिनिधी विज्ञान भवनात पोहोचले आहेत. विज्ञान भवनाला भेट देताना डोबा शेतकरी संघर्ष समितीचे हर्सूलिंदर सिंग म्हणाले की, कायदे मागे घेण्याची आमची मागणी आहे. कायद्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव आम्ही स्वीकारणार नाही. आझाद शेतकरी संघर्ष समितीचे पंजाब प्रमुख हरजिंदरसिंग तांडा म्हणाले, आम्ही कायदे पूर्णपणे मागे घेण्याची मागणी करतो. सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवू. 

दरम्यान, आतापर्यंतच्या सरकारसोबतच्या चार बैठका फेल ठरल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पाचव्या बैठकीत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, तर संसेदला घेराव घालू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Related Stories

किश्तवाडमध्ये दहशतवादी अड्डा उध्वस्त; 25 जिलेटीन कांड्या हस्तगत

datta jadhav

लसीकरण लाभार्थ्यांवर ‘शून्य’ गंभीर दुष्परिणाम

Patil_p

उत्तराखंड : सोमवारी 1961 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण

pradnya p

वय 1 वर्ष…कोरोना 74 दिवस…बिल 6 लाख

Patil_p

बंगाली अभिमान अन् संस्कृती रक्षणाचा तृणमूलकडून नारा

Patil_p

भारत-पाक शस्त्रसंधीचे पालन कसोशीने करणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!