तरुण भारत

मनपाडळेत माळरानावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

प्रतिनिधी / पेठ वडगाव

मनपाडळे (ता. हातकणंगले) येथे निसर्ग हॉटेलच्या उत्तरेला वन विभागाच्या माळरानावर अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. वर्णन-वय वर्षे अंदाजे ५०-५५, गळ्यात माळ, अंगात बंडी, पांढरा शर्ट, पांढरी विजार, पायात प्लास्टिकचा बूट, उजव्या पायाला गुडघ्याच्या खाली व्रण आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असुन हा मृत्यू दोन ते तीन दिवसापूर्वी झाला असण्याची शक्यता आहे.

Advertisements

या वर्णनाचे व्यक्तीचे कोणी नातेवाईक असल्यास वडगाव पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. घटनास्थळी प्रभारी अधिकारी वडगाव पोलिस ठाणे भापोसे डॉ. धीरजकुमार, पो.ना. आर. ए. पाटील, पो. कॉ. के. बी. पाटील, पो. कॉ. संदीप गायकवाड यांनी पंचनामा करण्यात येवून मृतदेह सीपीआर येथे नेण्यात आला आहे.

Related Stories

ज्येष्ठ शाहीर राजाराम जगताप यांचे निधन

Abhijeet Shinde

नव्या पिढीला समतेची प्रेरणा देणारे स्मारक : शरद पवार

Abhijeet Shinde

इचलकरंजी योजना रद्द होईपर्यंत नेटाने लढा देण्याचा शेतकर्‍यांचा निर्धार

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाने दोघांचा बळी

Abhijeet Shinde

भाड्याने राहणाऱ्या नागरिकांना शासनाचा दिलासा

Abhijeet Shinde

धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात 28 बळी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!