तरुण भारत

वैभववाडीत नवीन मतदान नोंदणी कार्यक्रम

नागरिकांनी सहभागी होण्याचे तहसीलदारांचे आवाहन

प्रतिनिधी / वैभववाडी:

नवीन मतदान नोंदणी कार्यक्रम व मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम गावागावात जाहीर झाला आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार रामदास झळके यांनी केले आहे.

येथील तहसील कार्यालयात मतदार यादीचा विशेष पुननिरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष मंगेश लोके, भाजपचे प्रतिनिधी अनंत फोंडके, काँग्रेस तालुकाध्यक्ष दादामियाँ पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, बसपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत जाधव तसेच नायब तहसीलदार अशोक नाईक, नायब तहसीलदार सौ. कासकर व कर्मचारी उपस्थित होते. वैभववाडी तालुक्मयामध्ये निवडणूक मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रम व विशेष जनजागृती कार्यक्रम 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत जाहीर करण्यात आला आहे. या विशेष जनजागृती कार्यक्रमांतर्गत गावात मतदार यादीचे वाचन करणे, मयत मतदारांचे नमुना नं. 7 भरून घेणे, दुबार मतदारांचे नमुना नं. 7 भरून घेणे, स्थलांतरित/ कायम स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्याकरिता नमुना नं. 7 भरून घेणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदारांच्या नावातील दुरुस्ती करणे, तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांचे नमुना नं. 8 भरून घेणे, छायाचित्र नसलेले मतदार आढळ होत नसेल किंवा कायमस्वरुपी स्थलांतरित झाले असल्यास पंचयादीसह नमुना नं. 7 भरून घेणे याबाबतची माहिती व मार्गदर्शन तहसीलदार झळके यांनी केले. 15 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे. मतदार यादी प्रसिद्धीचा दिनांक 15 जानेवारी 2021 आहे.

5 व 6 डिसेंबर तसेच 12 व 13 डिसेंबर या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 11 ते सायं. 4 वाजेपर्यंत उपस्थित राहून मतदारांचे नमुना नंबर 6, 7, 8 व 8 अ फॉर्म वाटप व स्वीकारण्याचे काम करणार आहेत. तालुक्मयातील नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार झळके यांनी केले आहे.

Related Stories

कोरोना योध्दा बालरोगतज्ञ डॉ.दिलीप मोरे यांचे निधन

Patil_p

लॉकडाऊनमध्ये मिळविला, पोस्टाने ‘करोडों’चा विश्वास

NIKHIL_N

‘क्वारंटाईन’ प्रक्रियेबाबत पालिका अंधारात

NIKHIL_N

चिपळुणात स्वातंत्र्यदिनीच कोरोनाग्रस्ताची आत्महत्या

Patil_p

गुहागर तालुक्यात 4 बिअर, 3 देशी दारू दुकाने सुरू

Patil_p

कोरोना नमुना तपासणी प्रमाण वाढले

NIKHIL_N
error: Content is protected !!