तरुण भारत

यंदा नववर्षाच्या स्वागतावरही कोरोनाची छाया

महसूल मंत्री आर. अशोक यांची माहिती

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

कर्नाटकात सध्या कोरोना रुग्णसंख्या घटत चालली असली तरी महिन्याभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे उघडपणे किंवा सार्वजनिकरीत्या नववर्षाचे स्वागत असणार नाही. राजधानी बेंगळूरसह संपूर्ण राज्यात कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली.

भाजप राज्य कार्यकारिणीत भाग घेण्यासाठी महसूल मंत्री बेळगावला आले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, सार्वजनिकरीत्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. मात्र, हॉटेलमध्ये कोविड नियमांचे पालन करीत नववर्षाचे स्वागत करता येणार आहे. यासाठी लवकरच मार्गसूची जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण राज्यात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरवषी बेंगळूर येथील एम.जी. रोड, ब्रिगेड रोड परिसरात रस्त्यांवर नववर्षाचे स्वागत केले जाते. तरुणाईची मोठी गर्दी असते. यंदा अशा झुंडींवर बंदी घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून या संबंधी निर्णय घेण्यात येणार आहे, असेही आर. अशोक यांनी सांगितले.

आपण गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा केली आहे. हॉटेलमध्येही 50 टक्के आसनांना परवानगी दिली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा फैलाव वाढू नये याची दक्षता घेत प्रत्येकांनी नववर्षाचे स्वागत करावे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच मार्गसूची जारी करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले. 

Related Stories

ज्योर्तिलिंग मंदिरात काशीविश्वेशर आणि वैष्णोदेवीची आरास

Amit Kulkarni

कर्नाटक सीईटी : शुक्रवारी ६३ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी उपस्थित

Abhijeet Shinde

तीन तासात पकडले तीन नाग साप

Amit Kulkarni

रजनीकांत यांनी पुरस्कार अर्पण केलेले राज बहादूर आहेत तरी कोण?

Abhijeet Shinde

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यावर कार्यशाळा

Rohan_P

कॅन्टोन्मेंट हद्दीतील हायमास्ट-पथदीप बनले शोभेचे

Omkar B
error: Content is protected !!