तरुण भारत

भारतीय वंशाची गीतांजली ठरली ‘किड ऑफ द इयर’

‘टाईम’ मासिकाकडून गौरव : पाच हजार मुलांमधून निवड

लंडन / वृत्तसंस्था

Advertisements

टाईम मासिकाने पहिल्यांदा लहान मुलांच्या पुरस्काराची घोषणा केली. भारतीय वंशाची अमेरिकेची नागरिक गीतांजली राव या 15 वर्षांच्या मुलीला टाईमच्या मासिकाचा पहिला ‘किड ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. उदयोन्मुख संशोधक असलेल्या गीतांजलीची निवड विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया सुमारे पाच हजार मुलांमधून झाली आहे.

गीतांजलीने याआधी सायबर बुलिंगच्या त्रासापासून वाचवण्यासाठी एका ऍपची निर्मिती केली होती. सध्या पाण्याची शुद्धता तपासणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तिचे संशोधन सुरू आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे गीतांजलीची मुलाखत घेतली. त्यावेळी गीतांजलीने आपल्या संशोधनांची माहिती दिली. सायबर बुलिंग रोखण्यासाठी मी किंडली ही सेवा सुरू केलीय. हे एकप्रकारचे ऍप आणि क्रोम एक्स्टेन्शन आहे. ते सुरुवातीच्या टप्प्यावर सायबर बुलिंग पकडण्यास सक्षम असेल, असे  गीतांजली म्हणाली. जग आज नव्या जागतिक महामारीचा सामना करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि सायबरसारख्या अनेक समस्या आहेत. आपल्याला तंत्रज्ञानाच्या आधारे त्यावर उपाययोजना शोधायच्या आहेत, असेही तिने स्पष्ट केले आहे.

Related Stories

हवालदार ए. एन. तुक्कार यांना मुख्यमंत्री पदक बहाल

Amit Kulkarni

कॅम्प येथे गुलमोहर उन्मळून पडला

Patil_p

आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून अहोरात्र परिश्रम

Patil_p

खानापूर-हल्याळ मार्गावरील बससेवा नंदगडपर्यंत

Amit Kulkarni

परराज्यामधून येणाऱया नागरिकांचा ओढा सुरूच

Patil_p

सीमाप्रश्नासाठी एकदिलाने लढा द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!