तरुण भारत

फॉर्ममधील मुंबईचा आज बांबोळीत ओडिशाशी सामना

मडगाव

 सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज बांबोळीतील जीएमसी मैदानावर मुंबई सिटी एफसीचा सामना ओडिशा एफसी संघाशी होईल. ओडिशाचा खेळ डळमळीत होत असल्याने मुंबई सिटीचे पारडे जड असेल.

Advertisements

पहिल्या दोन सामन्यात मुंबई सिटीला सातत्य राखता आले नाही. त्यानंतर बुधवारी ईस्ट बंगालवरील 3-0 अशा विजयाने मुंबई सिटीला फॉर्म गवसल्याचे दिसून आले. सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा फॉर्म कायम राखण्याचा त्यांचा निर्धार असेल.

भक्कम कामगिरीमुळे मुंबई सिटीच्या खेळाडूंचे मनोध्यैय उंचावलेले असेल. विजय मिळविल्यास आघाडीवरील एटीके मोहन बागान संघाला ते गुणांवर गाठू शकतील. अहमद जाहू, रॉवलीन बॉर्जिस आणि ऍडम ली फाँड्रे असे खेळाडू ईस्ट बंगालविरूद्ध विलक्षण फॉममध्ये होते. त्यानी फॉर्म कायम राखल्यास मुंबई सिटीला हरवणे ओडिशासाठी अवघड असेल.

‘माझ्यादृष्टिने कोणताही संघ संभाव्य विजेता नाही. अभूतपूर्व परिस्थितीमुळे हा मोसम अत्यंत वेगळा आहे. मी माझ्या संघावर लक्ष केंदीत ठेवले आहे. त्यांच्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे. आम्ही दोन सामने जिंकले आहेत, पण आम्हाला बऱयाच गोष्टींत सुधारणा करावी लागेल, असे सर्जिओ लॉबेरा म्हणाले.

दुसरीकडे आडिशा एफसीचा फॉर्म सर्वोत्तम फॉर्मात नाही. ओडिशाचे प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्सटर यांच्यासमोर संपूर्ण मैदानभर समस्या आहेत. त्यांच्या संघाला तीन सामन्यांत केवळ दोन गोल करता आले आहेत.

Related Stories

ऑस्ट्रेलियाविरुद्ध निश्चितपणाने खेळेन

Patil_p

संजय मांजरेकर यांचा समालोचन पथकात समावेश

Patil_p

भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामला सुवर्ण

Amit Kulkarni

केकेआरविरुद्ध आज रोहित खेळण्याचे संकेत

Patil_p

आज तरी बहरणार का मुंबई इंडियन्सचे ‘मेगास्टार’?

Patil_p

डेव्हिड वॉर्नर बहरात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा फडशा

Amit Kulkarni
error: Content is protected !!