तरुण भारत

वाळपईतील हिंदुस्थान ऍरोनॉटिकलच्या उद्योगाचे काम सुरू होणार

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून वेर्णातील कारखान्याची पाहणी

प्रतिनिधी/ वास्को

हिंदुस्थान ऍरोनॉटील लिमिटेडच्या वाळपईतील उद्योग प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झालेले आहेत. या प्रकल्पात एwशी टक्के रोजगार स्थानिकांना प्राप्त करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी हिंदुस्थान ऍरोनॉटील लिमिटेडच्या अध्यक्षांनी नुकतीच वाळपईला भेट दिल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

शनि<वारी दुपारी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी वेर्णातील बंदुकीची काडतुसे व अन्य दारूगोळा उत्पादन करणाऱया खासगी कारखान्याला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. गोव्यातील अशा प्रकारचे उत्पादन करणारा हा पहिलाच प्रकल्प असून तो नुकताच स्थापन झालेला आहे. डिआरडीओकडून मान्यता प्राप्त केलेला हा प्रकल्प असून देशाच्या संरक्षण संस्थानाही सामुग्री पुरवण्याची कामगीरी हा प्रकल्प करणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प गोव्यात आला आहे याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे व हा प्रकल्प स्थानिक बेरोजगारांना रोजगार देणार असल्याचे श्रीपाद नाईक यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना असलेल्या मेक इन इंडियाचाच हा एक भाग आहे असे ते म्हणाले.

वाळपईतील ऍरोनॉटिकल प्रकल्प सुरू होईल

यावेळी त्यांनी वाळपई येथील हिंदुस्थान ऍरोनॉटिकल लिमिटेडच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, हिंदुस्थान ऍरोनॉटिकल व प्रॅन्च कंपनी असलेल्या सॅफ्रोन कंपनी या दोघांच्या सहयोगातून वाळपईत हेलिकॉप्टरला लागणारे सुटे भाग बनवण्याचा उद्योग उभारण्याचे काम सुरू झाले होते. माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या प्रयत्नातून हे काम सुरू झाले होते. मात्र, कोविडचा प्रसंग उद्भभवल्यानंतर सदर प्रॅन्च कंपनी माघारी परतल्याने या प्रकल्पाचे काम बंद पडले होते. या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. ती कंपनी परत येणार आहे. हिंदुस्थान ऍरोनॉटिकल लिमिटेडच्या अध्यक्षांनी नुकतीच त्यासंबंधी गोव्यात भेट दिलेली आहे. विदेशी सहकार्यातून उभा राहणारा हा उद्योग गोवा शिपयार्डसारखा देशाच्या संरक्षणाच्या कार्यात सहकार्य करेल. या उद्योगातून मुबलक रोजगारही प्राप्त होईल. स्थानिक बेरोजगारांना एwशी टक्के रोजगार या उद्योगातून दिला जाईल असे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

Related Stories

वादानंतर सागरी कासव महोत्सवाचे उद्घाटन

Patil_p

रवींद्र केळेकर ज्ञानपीठ केंद्राचे उद्या लोकार्पण

Omkar B

सीएमएम अरेनामध्ये ख्रिसमसनिमित्त ऑफर

Omkar B

साळजिणी येथील रस्त्याची चाळण, लोक हैराण

Patil_p

‘लोकमान्य’ सोसायटी लोकांच्या विश्वासाला पात्र

Omkar B

पाच पालिकांचे भवितव्य लटकतेच

Amit Kulkarni
error: Content is protected !!