तरुण भारत

यशवंतराव चव्हाण यांचा वारसा चालविणार

नवनिर्वाचित आमदार जयंत आसगावकर यांची ग्वाही

प्रतिनिधी / कराड

Advertisements

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे विकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय झाला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविणार आणि सहा वर्षे विधान परिषदेत काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित आमदार जयंत आसगावकर यांनी कराड येथे दिली.

पुणे शिक्षक मतदार संघातून विजयी झालेले आमदार जयंत आसगावकर यांनी आज येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सातारा जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष झाकिर पठाण, नगरसेवक इंद्रजीत गुजर, गजानन आवळकर, इंद्रजीत चव्हाण, श्रीकांत मुळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आप्पा माने, मलकापूर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, अशोकराव पाटील प्रदीप जाधव, नंदकुमार बटाणे, अजीम इनामदार यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघामध्ये दोन्ही उमेदवाराचा विजय झाला. यामध्ये सिंहाचा वाटा व योगदान विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे.

दरम्यान नवनिर्वाचित आमदार जयंत आसगावकर यांचे कराडमध्ये विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी जयंत आसगावकर यांनी सदिच्छा भेट दिली.  शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भोसले यांनी कराड येथे स्वागत केले. कराड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवकसौरभ पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कराड शहर अध्यक्ष पोपट साळुंखे, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सतिश भोंगाळे, बाळासाहेब पाटील, शिवसेना कराड शहरप्रमुख शशिराज करपे, शिवसेना कराड उपशहरप्रमुख अक्षय गवळी उपस्थित होते

Related Stories

कोल्हापूर : बीएसएनएल’ची ढिसाळ यंत्रणा, गेली महिनाभर ना नेटवर्क.. ना इंटरनेट

Abhijeet Shinde

आजपासुन गोदाम अधिकारी, कर्मचारी संपावर

Patil_p

वारसदारांच्या नोकरीचा मार्ग झाला मोकळा

Patil_p

कदाचित मुख्यमंत्र्यांचा आदेश राज ठाकरेंना पाळायचा नसेल?

datta jadhav

कर्तव्य बजावताना पोलिसाच्या अंगावर गाडी घातल्याने मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांची संख्या 218 वर; शाहूवाडीत सर्वाधिक 69

Abhijeet Shinde
error: Content is protected !!