25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

चिपळुणात 75 हजाराचा गुटखा जप्त

चिपळूण

शहरातील रंगोबा साबळे मार्गावर काही दिवसांपूर्वी गुटखा पकडल्याची घटना ताजी असतानाच शक्रवारी सावर्डे बाजारपेठेत अन्न व औषध प्रशासनाने एका जनरल स्टोअर्सच्या दुकानातून धाड टाकून तब्बल 75 हजार किंमतीचा गुटखा व प्रतिबंधित केलेले पदार्थ जप्त केले. या प्रकरणी एकास अटक केली आहे.

अमोल अशोक कोकाटे (35, सावर्डे बाजारपेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद विजय जयसिंग पाचपुते (अन्न व औषध प्रशासन अधिकारी-रत्नागिरी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे याने सावर्डे बाजारपेठेतील मे. संतोषी माता जनरल स्टोअर्स नावाच्या दुकानात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, या प्रतिबंधित केलेल्या पदार्थाचा साठा करुन ठेवला होता. या बाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास धाड टाकली. अधिकाऱयांच्या तपासणीअंती 75 हजार 645 रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात कोकाटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानुसार त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

काही वर्षापूर्वी सावर्डे बाजारपेठेत लाखोचा गुटखा जप्त करण्यात आला होता. तसेच शहरातील रंगोबा साबळे मार्गावरही लाखोचा गुटखा जप्त करण्यात आला असतानाच पुन्हा सावर्डेत गुटखा जप्त केल्यामुळे तालुक्यात गुटखा वितरकाची मोठी साखळी असून यात काही उद्योजकच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, हा गुटखा नेमक कोठून आणला गेला, तसेच याचा मुख्य सूत्रधार कोण, हे चौकशीअंती पुढे येणार आहे.

Related Stories

हर्णेची बदनामी करणाऱयावर गुन्हा दाखल करणार: हजवानी

Patil_p

कशेडीत एसटी बस कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू

triratna

नांदगाव रिक्षास्टँड वादप्रश्नी कार्यवाही करा!

NIKHIL_N

दाणोली साटम महाराज पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा

NIKHIL_N

वाहनांच्या कर आकारणीमध्ये सवलत द्यावी!

NIKHIL_N

सापुचेतळेतील अपघातात एक ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!