तरुण भारत

कणकवली पोलिसांचा एसपींनी केला सत्कार

कणकवली:

फेब्रुवारी 2019 मध्ये घडलेल्या विनयभंग आणि चोरीच्या गुन्हय़ाचा यशस्वी तपास करून आरोपी मधु कोकरे याला न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याबद्दल पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कणकवली पोलीस स्थानकाच्या तत्कालीन तपासी टिमचा सत्कार केला. हा सत्कार कार्यक्रम ओरोस येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला.

Advertisements

तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार उत्तम पवार, पोलीस नाईक नजीर सय्यद, कॉन्स्टेबल वैभव कोळी, कॉन्स्टेबल राकेश कडुलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

एसटी स्टँडकडे जाणारा जवळचा रस्ता दाखविण्याच्या बहाण्याने कणकवली शहरातील मराठा मंडळ रस्त्यालगत मधु सगू कोकरे याने महिलेचा विनयभंग करून तिचा मोबाईल व रक्कम लंपास केली होती. घटनेनंतर 15 दिवसांनी सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात व पथकाने पसार असलेल्या कोकरे याच्या मुसक्या आवळल्या होत्या. पुढे योग्य तपासकाम करून भक्कम पुरावे न्यायालयासमोर ठेवल्यामुळे कोकरे याला जिल्हा सत्र न्यायालयाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. गुन्हय़ाचा प्राथमिक तपास मालवण पोलीस स्थानकाचे निरीक्षक तथा कणकवली पोलीस स्थानकाचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सोनू ओटवणेकर तर पुढील तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री पाटील यांनी केला होता.

Related Stories

चिपळुणात ऐन पावसातही बेकायदा वाळू उत्खनन

Patil_p

दलितमित्र तात्या कोवळे यांचे निधन

Patil_p

दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना धनादेश

NIKHIL_N

जिल्हय़ात 27 हजार 859 जणांना लस

NIKHIL_N

लोटेतील भुयारीमार्गाचा प्रश्न मार्गी!

Patil_p

दोडामार्गात मोकाट गुरे मुख्याधिकाऱयांच्या ताब्यात

NIKHIL_N
error: Content is protected !!