तरुण भारत

शेतकऱयांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे

वार्ताहर/ हुबळी

केंद्र सरकार पहिल्यापासूनच शेतकऱयांच्या बाजूने असून त्यांच्या समस्यांबाबत मुक्तपणे चर्चा करण्यात तयार आहे. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू नये, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. कृषी दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवून 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदवर ते प्रतिक्रिया देत होते.

Advertisements

यापूर्वीच लोकसभेत आम्ही शेतकऱयांना स्पष्टपणे भरवसा दिला आहे. दुरुस्ती कायद्यामध्ये कोणता तरी गोंधळ असल्याच तो दूर  करण्यास तयार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसला पाठिंबा देऊन आम्ही चुकीचा निर्णय घेतला होता, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, काँग्रेस धोकेबाज असल्याचे कुमारस्वामींना आता कळले आहे. तसेच पुढील दिवसात कोणते निर्णय घ्यावेत, याचा त्यांनी विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

समर्थनगरमध्ये चिखलाचे साम्राज्य

Amit Kulkarni

बिजगर्णी, बेळवट्टी ग्रा.पं.साठी चुरशीने मतदान

Amit Kulkarni

तिसऱया रेल्वेगेटवर सर्वाधिक लांबीचा स्पॅन

Amit Kulkarni

7 लाख 16 हजार 925 हेक्टरमध्ये खरीप हंगामाचे उद्दिष्ट

Omkar B

कारवार जिल्हय़ात कोरोनाबाधितांनी गाठला दोनशेचा टप्पा

Amit Kulkarni

गुंजेनहट्टी होळी कामाण्णा यात्रा गाव मर्यादित

Patil_p
error: Content is protected !!