तरुण भारत

नदीकाठावरील देवदेवतांच्या प्रतिमांचे संकलन

सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील सर्व लोक सेवा फाऊंडेशनच्यावतीने नदीकाठावरील देवदेवतांच्या प्रतिमांचे संकलन करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून हा उपक्रम सुरू असून हिंडलगाजवळील नदीकाठावर असलेल्या गणेश मंदिरानजीक रविवारी हा उपक्रम राबविण्यात आला.

आनंद भातकांडे, वीरेश हिरेमठ, रवि कोकितकर, करण भोसले, बाळू कणबरकर, शिवमूर्तय्या बुर्लकट्टी, निंगय्या बुर्लकट्टी, गौरीश हिरेमठ, संगमेश हलशी आदींनी उचगाव रोडवर हा उपक्रम राबविला. मार्कंडेय नदीकाठावर भग्न झालेल्या देवदेवतांच्या प्रतिमा टाकून देण्यात आल्या आहेत.

या सर्व प्रतिमा जमा करण्यात आल्या. लवकरच अग्निहोत्र करून विधिवत त्यांचे विसर्जन करण्यात येणार असल्याचे वीरेश हिरेमठ यांनी सांगितले. नागरिकांनी हिंदू देवदेवतांची विटंबना करू नये, असे आवाहनही वीरेश हिरेमठ व हिंदू संघटनेचे रवि कोकितकर यांनी केले आहे.

Related Stories

माजी सैनिक मल्टिपर्पज सोसायटीची 9वी सर्वसाधारण सभा

Patil_p

1 जून पासून न्यायालये सुरु होणार

Patil_p

अंमली पदार्थमुक्त राज्यासाठी अभाविपची पत्रमोहीम

Patil_p

दिव्यांनी सजला कपिलेश्वर मंदिर परिसर

Patil_p

जितो बेळगावच्या अध्यक्षपदी सुनील कटारिया

Patil_p

खासगी कुरिअरला पोस्टाची टक्कर

Amit Kulkarni
error: Content is protected !!